Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घट, 72 दिवसातील निचांकी आकडे

| Updated on: Jun 14, 2021 | 9:44 AM

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 95 लाख 10 हजार 410 वर गेला आहे.

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये मोठी घट, 72 दिवसातील निचांकी आकडे
Corona
Follow us on

नवी दिल्ली : देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) मोठी घट पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत कोरोना बाधितांच्या संख्येत घट झाली आहेच, मात्र गेल्या 72 दिवसातील ही निचांकी आकडेवारी ठरली आहे. कालच्या दिवसात 70 हजार 421 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. कालच्या दिवसात 3 हजार 921 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले आहेत. नव्या कोरोनाग्रस्त रुग्णसंख्येत घट होत असल्याने दिलासा व्यक्त केला जात आहे. तसेच कोरोनातून बरे होणाऱ्यांचीही संख्या वाढत आहे (New 70421 Corona Cases in India in the last 24 hours)

24 तासातील आकडेवारी

गेल्या 24 तासात भारतात 70 हजार 421 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 3 हजार 921 रुग्णांना प्राण गमवावे लागले. कालच्या दिवसात देशात 1 लाख 19 हजार 501 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले.

आतापर्यंतची आकडेवारी

भारतातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा आता 2 कोटी 95 लाख 10 हजार 410 वर गेला आहे. देशात 2 कोटी 81 लाख 62 हजार 947 रुग्ण बरे झाले आहेत. आतापर्यंत 3 लाख 74 हजार 305 रुग्णांनी कोरोनामुळे प्राण गमावले आहेत. तर 9 लाख 73 हजार 158 इतके सध्याच्या घडीला सक्रिय रुग्ण आहेत.

आतापर्यंत कोरोना लसीकरण झालेल्या देशातील नागरिकांची संख्या 25 कोटी 48 लाख 49 हजार 301 इतकी असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

देशात 24 तासात नवे रुग्ण – 70,421

देशात 24 तासात डिस्चार्ज – 1,19,501

देशात 24 तासात मृत्यू – 3921

एकूण रूग्ण –  2,95,10,410

एकूण डिस्चार्ज – 2,81,62,947

एकूण मृत्यू – 3,74,305

एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 9,73,158

आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 25,48,49,301

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक लसीकरणाची नोंद

2 डोसमधील अंतर वाढवल्यास संसर्गाचा धोका अधिक, अमेरिकेच्या वैद्यकीय सल्लागारांचा दावा

(New 70421 Corona Cases in India in the last 24 hours)