मोदीजी, भारताचा नंबर कधी येणार? लसीकरणाबाबत राहुल गांधींचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लस निर्मिती केंद्रांना भेट दिल्यानंतर भारतातही लसीकरणाची तयारी सुरु करण्यात आली आहे. अशावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक प्रश्न विचारला आहे.

मोदीजी, भारताचा नंबर कधी येणार? लसीकरणाबाबत राहुल गांधींचा सवाल
Follow us
| Updated on: Dec 23, 2020 | 11:17 AM

नवी दिल्ली: ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्यानंतर जगभरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे आता लसीकरणाच्या मुद्द्यावर ब्रिटनसह अमेरिका, चिनलाही चिंता लागून राहिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील लस निर्मिती केंद्रांना भेट दिल्यानंतर भारतातही लसीकरणाची तयारी सुरु करण्यात आली आहे. अशावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक प्रश्न विचारला आहे. (Rahul Gandhi question to PM Narendra Modi about corona vaccination)

“जगभरात 23 लाख लोकांनी कोरोनाची लस घेतली आहे. चीन, अमेरिका, ब्रिटन आणि रशियातही लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मोदीजी, भारताचा नंबर कधी येणार?”, असं ट्वीट राहुल गांधी यांनी केलंय.

‘लॉकडाऊनमुळे कोट्यावधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त’

देशातील कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटीच्या पुढे गेल्यानंतर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. काही तयारी न करताच लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे कोट्यावधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झाल्याचा गंभीर आरोप राहुल गांधी यांनी केला होता.

“कोरोना रुग्णांची संख्या 1 कोटी झाली आहे आणि जवळपास दीड लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. पंतप्रधान मोदी यांनी दावा केला होता. पण अनियोजित लॉकडाऊनमुळे 21 दिवसांत लढाई जिंकली जाऊ शकत नाही. त्यामुळे देशात कोट्यावधी लोकांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं”, असं ट्विट राहुल गांधी यांनी 19 डिसेंबरला केलं होतं.

ब्रिटीश निर्मित कोरोना लसीला भारतात मंजुरी मिळणार?

भारताकडून ऑक्सफोर्ड / अ‍ॅस्ट्रॅजेनेकाच्या कोरोनाव्हायरस लसीला तातडीच्या वापरासाठी पुढील आठवड्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. ब्रिटीश औषध निर्मात्याच्या लसीसाठी हिरवा कंदील देणारा भारत हा पहिला देश असू शकतो. फायझर इंक आणि स्थानिक कंपनी भारत बायोटेक यांनी तयार केलेल्या लसींसाठी ही आपत्कालीन वापराच्या अधिकृतता अर्जांवर विचार सुरू आहे. त्यामुळे लवकरच भारतीयांना कोरोना लस मिळण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या:

New Corona Strain : ब्रिटनहून आलेले 20 जण कोरोना पॉझिटिव्ह, प्रवाशांवर सरकारची नजर

भारतात 69 टक्के लोक म्हणतात, लसीकरणाची गरज नाही!, जाणून घ्या काय आहे कारण?

Rahul Gandhi question to PM Narendra Modi about corona vaccination

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.