दिल्ली ‘ऑल टाइम हाय’ 52.3 डिग्री तापमान, नागपुरात ऑरेंज अलर्ट, मान्सून 24 तासांत केरळमध्ये

monsoon tomorrow in kerala: वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी बातमी आली आहे. मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यंदा मान्सून अंदमान निकोबारमध्ये वेळेआधा 19 मे रोजीच दाखल झाला होता.

दिल्ली 'ऑल टाइम हाय' 52.3 डिग्री तापमान, नागपुरात ऑरेंज अलर्ट, मान्सून 24 तासांत केरळमध्ये
Follow us
| Updated on: May 30, 2024 | 10:08 AM

Weather Report: देशात तापमानाचा नवीन विक्रम झाला आहे. राजस्थानमधील तापमान कधीच 50 डिग्री सेल्सियसच्या वर गेले आहे. त्यानंतर आता नवी दिल्लीत विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. दिल्लीत तापमान ‘ऑल टाइम हाय’ 52.3 डिग्रीवर नोंदवण्यात आले आहे. परंतु या तापमानाबाबत संशय व्यक्त होत आहे. दुसरीकडे वाढत्या तापमानात गारवा निर्माण करणारी मान्सूनची बातमी आहे. येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये धडकणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

दिल्लीतील तापमानाबाबत संशय

भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, दिल्लीतील केंद्रांवर जास्तीत जास्त 52 डिग्री सेल्सियस तापमान नोंदवण्यात आले. मुंगेशपूरमध्ये 52.3 डिग्री तापमान नोंदवले गेले तर नरेलामध्ये 49.9 डिग्री आणि नजफगढमध्ये 49.8 डिग्री तापमान नोंदवण्यात आले. वाढत्या तापमानामुळे नवी दिल्लीत विजेची मागणी वाढली आहे. 22 मे रोजी 8000 मेगावॅट विजेची मागणी झाली होती. नवी दिल्लीत गेल्या 79 वर्षांत प्रथमच इतके तापमान नोंदवण्यात आले आहे. दरम्यान, या तापमानाबाबत आयएमडीलाच संशय आहे. सेंसरमधील बिघाड किंवा स्थानिक पातळीवर केलेली चूक म्हणजे हे तापमान असू शकते, असे म्हटले जात आहे.

नागपुरात ऑरेंज अलर्ट

नागपूरात आज उष्णतेच्या लाटेचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे नागपूर महानगरपालिका प्रशासनाने ‘हिट ॲक्शन प्लान’ लागू केला आहे. यामध्ये नागपुरातील गार्डनच्या वेळा बदलण्यात आल्या आहेत. जेणेकरुन दुपारच्या वेळेत उन्हात असलेल्या लोकांना सावलीत विसावा घेता येणार आहे. त्यासोबत उन्हात बाहेर पडणाऱ्यांसाठी ठिकठिकाणी पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली आहे. सिग्नलवर सावलीसाठी ग्रीन नेट, काही ठिकाणी विसाव्यासाठी शेडची सोय करण्यात आली आहे, अशी माहिती नागपूर महानगरपालिका आयुक्त डॅा. अभिषेक चौधरी यांनी दिली. याशिवाय गरज नसताना दुपारी लोकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन मनपाकडून करण्यात आले आहे. महानगरपालिकेची आरोग्य यंत्रणा सध्या अलर्टवर ठेवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा

मान्सून उद्या केरळमध्ये

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर दिलासा देणारी बातमी आली आहे. मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यंदा मान्सून अंदमान निकोबारमध्ये वेळेआधा 19 मे रोजीच दाखल झाला होता.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.