Siddhu Moosewala Murder : मूसेवाला हत्या प्रकरणी नवा खुलासा, 27 मे रोजी मारण्याचा होता प्लान, मारेकऱ्यांनी पाठलागही केला; पण…
27 मे रोजी सिद्धू मुसेवाला कारमधून एकटाच निघाला होता. सिद्धू काही कामानिमित्त कोर्टात चालला होता. त्यानंतर बोलेरो आणि कोरोला कारमधील शूटर्सने सिद्धूचा पाठलाग केला. सिद्धूची कार मुख्य महामार्गावर वेगाने धावू लागली आणि शूटर्सला सिद्धूच्या कारचा फार दूरपर्यंत पाठलाग करता आला नाही आणि त्या दिवशी प्लान फसला
नवी दिल्ली : पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला हत्या (Siddhu Moosewala Murder) प्रकरणात नवीन खुलासा (Revealed) समोर आला आहे. मूसेवाला याची हत्या करणाऱ्या गोळीबाराचा सूत्रधार प्रियव्रत फौजी याने पोलिसांकडे केलेल्या चौकशीत अनेक खुलासे केले आहेत. सिद्धूला 27 मे रोजीज मारण्याचा प्लान (Murder Plan) होता. मारेकऱ्यांनी त्याचा पाठलागही केला होता. मात्र तो सुखरुप बचावला. सिद्धूला गोळी मारणारा शूटर आणि बुलेरो मॉड्यूलचा प्रमुख प्रियव्रत फौजी याने चौकशीदरम्यान ही माहिती दिल्याचे विशेष सेलच्या सूत्रांनी सांगितले. प्रियवत फौजी आणि कशिश कुलदीप या दोन शूटर्सला 20 जू रोजी विशेष सेलच्या पथकाने गुजरातमधील मुंद्रामधून अटक केली. दोघेही हरियाणातील गँगस्टर असून सध्या या दोघांचीही चौकशी सुरु आहे.
27 मे रोजी सिद्धूचा दूरपर्यंत पाठलाग करता न आल्याने तो बचावला
शूटर प्रियव्रत फौजी याने पोलिसांना सांगितले की, 27 मे रोजी सिद्धू मूसेवाला कारमधून एकटाच निघाला होता. सिद्धू काही कामानिमित्त कोर्टात चालला होता. त्यानंतर बोलेरो आणि कोरोला कारमधील शूटर्सने सिद्धूचा पाठलाग केला. सिद्धूची कार मुख्य महामार्गावर वेगाने धावू लागली आणि शूटर्सला सिद्धूच्या कारचा फार दूरपर्यंत पाठलाग करता आला नाही आणि त्या दिवशी प्लान फसला, असे ‘आजतक’ने दिलेल्या वृत्तात म्हटले नाही.
शूटरकडून जप्त केलेली शस्त्र भारतीय बनावटीचे नाहीत. ही शस्त्र पाकिस्तानातून ड्रोनद्वारे आणल्याचा संशय पोलिसांना आहे. अटक करण्यात आलेल्या प्रियव्रत फौजीकडून चौकशी केल्यानंतर ग्रेनेड लाँचर, हँड ग्रेनेड, इलेक्ट्रॉनिक डिटोनेटर आणि एके-47 सारखी दिसणारी रायफल जप्त करण्यात आली आहे. स्पेशल सेलच्या सूत्रांच्या माहितीनुसार, ही शस्त्रे आधीच पाकिस्तानातून ड्रोनद्वारे आयात करण्यात आली होती.
बिष्णोईचे पाकिस्तानासह अमेरिकेतही नेटवर्क
लॉरेन्स बिश्नोई याचे पाकिस्तानात चांगले नेटवर्क आहे. याशिवाय पंजाबचा गँगस्टर जग्गू भगवानपुरीय हाही पाकिस्तानमधून ड्रग्ज मागवायचा. ड्रग्जसोबत अनेक वेळा शस्त्रही मागवली आहेत. जग्गूने एकदा 40 पिस्तुल मागवल्याचाही खुलासा चौकशीत केला होता. बिश्नोई टोळीला पाकिस्तान, मध्य प्रदेश, मुंगेर येथून शस्त्रे मिळत होती. वेगवेगळ्या सीमेवरून पंजाबमध्ये शस्त्रास्त्रे पोहोचवणारे बिष्णोईचे अमेरिकेतही नेटवर्क आहे. गुप्तचर यंत्रणा आता पाकिस्तानातून पंजाबमध्ये शस्त्रे आणण्याच्या अँगलने तपास करत आहेत. (New revelation from shooter in punjabi singer Sidhu Musewala murder case)