आजोबा नितीन गडकरी थेट खेळणीच्या दुकानात; नातीसाठी केली खास खरेदी

Hamley's storeमध्ये गडकरी पोहोचले होते. आपल्या नातीसाठी सरप्राईज गिफ्ट खरेदी करण्यासाठी ते स्टोअरमध्ये आले होते. या स्टोअरमध्ये त्यांनी बराच वेळ घालवला. वेगवेगळी खेळणी पाहिली.

आजोबा नितीन गडकरी थेट खेळणीच्या दुकानात; नातीसाठी केली खास खरेदी
आजोबा नितीन गडकरी थेट खेळणीच्या दुकानात; नातीसाठी केली खास खरेदी
Follow us
| Updated on: Oct 29, 2022 | 4:11 PM

नवी दिल्ली: प्रत्येक राजकारणी (politician) जसा खंबीर नेता असतो, तसाच तो हळवा कुटुंबप्रमुखही असतो. राजकारणीही आपल्या नातवंडांसोबत मनसोक्त वेळ घालवत असतात. केंद्रीय पर्यावरण मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी (nitin gadkari) हे सुद्धा आपल्या नातीसोबत नेहमी वेळ घालवत असतात. सध्या दिवाळीचा (diwali) उत्सव असल्याने व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत नितीन गडकरी थेट खेळणीच्या दुकानात गेले. संपूर्ण दुकानभर फिरून त्यांनी आपल्या नातीसाठी काही खेळणी विकत घेतली. आजोबा गडकरींचा हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढून नितीन गडकरी शुक्रवारी खेळणीच्या दुकानात पोहोचले. बिझनेस टुडेने याबाबत वृत्त दिलं आहे. Hamley’s storeमध्ये गडकरी पोहोचले होते. आपल्या नातीसाठी सरप्राईज गिफ्ट खरेदी करण्यासाठी ते स्टोअरमध्ये आले होते. या स्टोअरमध्ये त्यांनी बराच वेळ घालवला. वेगवेगळी खेळणी पाहिली. त्या खेळण्यांची माहितीही दुकानदारांकडून घेतली. प्रत्येक खेळणीचं वैशिष्ट्येही समजून घेतलं. दुकानदारांनीही त्यांना या खेळणीची माहिती देतानाच नातीला कोणती खेळणी देता येईल तेही सूचवल्याचं समजतं.

हे सुद्धा वाचा

Hamley’s हा एक ब्रिटिश ब्रांड आहे. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स कंपनी हा ब्रँड भारतात चालवते. रिलायन्सने आपल्या पोर्टफोलियोचा विस्तार करत अनेक टॉय मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण केला आहे. त्यात ब्रिटीश कंपनी हॅमलेजसह रोवन या भारतातील ब्रँडचाही समावेश आहे. हॅमलेजची चेन 15 हून अधिक देशात आहे. तर भारतात या ब्रँडची सर्वात मोठी चेन आहे.

मागच्या जुलै महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका कार्यक्रमाला संबोधित केलं होतं. तेव्हा भारत खेळणीच्या निर्यातीतील पॉवर हाऊस बनू शकतो, असा दावा केला होता. भारताने खेळणीच्या उद्योगात यश मिळवलं आहे. याची कधीच कुणी कल्पनाही केली नव्हती. व्होकल फॉर लोकलचा मंत्र यशस्वी होत आहे. खेळणीचा उद्योग हे त्याचं द्योतक आहे, असंही त्यांनी सांगितलं.

Non Stop LIVE Update
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'
बच्चू कडू म्हणाले, 'आघाडीत बिघाडी अन् युतीमधील एक जण...'.
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्..
पट्टणकोडोली येथे विठ्ठल बिरदेव यात्रेला प्रारंभ, भंडाऱ्याची उधळण अन्...
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव
अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून 16 जणांना AB फॉर्म, बघा कोणा-कोणाचं नाव.
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की..
दिवाळी तोंडावर असताना लालपरीच्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस मिळणार की...
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह
राज्यातील तिसऱ्या आघाडीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, बच्चू कडूंसह.
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?
काँग्रेस आमदार रविंद्र धंगेकरांवर गुन्हा दाखल, भाजपनं काय केला आरोप?.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘या’ तारखेला भरणार विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज.
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम
''माझ्या बापाविषयी बोलाल तर...'', थोरातांच्या मुलीचा सुजय विखेंना दम.
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक
रात्रीस खेळ चाले, शिंदे-फडणवीस-राज ठाकरेंमध्ये मध्यरात्री गुप्त बैठक.
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?
शरद पवार गटाचे 33 नावं फिक्स, कोणाला उमेदवारी? सूत्रांची माहिती काय?.