अनुभवाने सांगतो, ड्रायव्हरचे डोळे खासगी डॉक्टरांकडूनच चेक करून घ्या; गडकरींचा राजनाथ सिंह यांना सल्ला

रस्ते सुरक्षा सप्ताहा निमित्त विज्ञान भवनात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी नितीन गडकरी यांच्यासह राजनाथ सिंहही उपस्थित होते. (nitin gadkari said check driver eyes to private hospital to rajnath singh)

अनुभवाने सांगतो, ड्रायव्हरचे डोळे खासगी डॉक्टरांकडूनच चेक करून घ्या; गडकरींचा राजनाथ सिंह यांना सल्ला
Follow us
| Updated on: Jan 19, 2021 | 1:00 PM

नवी दिल्ली: अनुभवाने सांगतो, तुम्हाला जर ड्रायव्हरचे डोळे तपासायचे असेल तर खासगी डॉक्टरकडूनच तपासून घ्या. सरकारी डॉक्टर चुकीचा रिपोर्ट देतात, असा मोलाचा सल्ला केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांना दिला. गडकरी यांनी हा सल्ला देताच सभागृहात एकच खसखस पिकली. (nitin gadkari said check driver eyes to private hospital to rajnath singh)

रस्ते सुरक्षा सप्ताहा निमित्त विज्ञान भवनात एका कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. याप्रसंगी नितीन गडकरी यांच्यासह राजनाथ सिंहही उपस्थित होते. यावेळी गडकरी यांनी आपल्या नर्मविनोदी शैलीत भाषण करत किस्से ऐकवले. महाराष्ट्रात विरोधी पक्षात असताना मी रेड लाईट कारमधून चाललो होतो. पूर्ण पोलीस बंदोबस्तात माझा ताफा निघाला होता. माझ्या ड्रायव्हरला मोतिबिंदू झाल्याचं मला नंतर कळालं. एका मुख्यमंत्र्यांच्या ड्रायव्हरच्या दोन्ही डोळ्यांची दृष्टी गेलेली होती. तर एका केंद्रीय मंत्र्याच्या एका ड्रायव्हरचा एक डोळा खराब झालेला आढळून आलं, असं गडकरी म्हणाले.

त्यानंतर हलका पॉझ घेऊन गडकरी म्हणाले, मी अनुभवाने सर्व मंत्र्यांना आणि राजनाथ सिंह यांनाही सांगतो, तुम्ही सर्व तुमच्या ड्रायव्हरच्या डोळ्यांची तपासणी खासगी डॉक्टरकडून करून घ्या. एखाद्या ड्रायव्हरला डोळ्याचा त्रास जाणवल्यास तो सर्टिफिकेट घेऊन येतो. गडकरींचा सर्टिफिकेटचा हा रोख सरकारी डॉक्टरांच्या दिशेने होता.

50 टक्के अपघात कमी करणार

त्यानंतर गडकरी यांनी रस्ते अपघातातील मृत्यूंवर चिंता व्यक्त केली. 2025पर्यंत रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या कशी कमी होईल, यावर भर दिला जात आहे. ही संख्या 50 टक्क्यांपेक्षा कमी होईल, यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. आता रस्ते अपघातात देशात रोज 415 लोकांचा मृत्यू होतो. ज्या कारणांमुळे अपघात होतात, ती कारणे दूर केली नाही तर 2030 पर्यंत रस्ते अपघातात मरणाऱ्यांची संख्या 6-7 लाखांवर जाण्याची शक्यता आहे, असंही त्यांनी सांगितलं.

मागास, आदिवासी भागात ड्रायव्हिंग स्कूल

देशातील मागासलेल्या भागात ड्रायव्हिंग स्कूल उघडण्याची सरकारची योजना आहे. त्यामुळे 22 लाख लोकांना रोजगार मिळेल. तसेच रस्ते अपघातातील मृत्यूचं प्रमाणही कमी होील. मागास आणि आदिवासी विभागात ड्रायव्हिंग ट्रेनिंग स्कूल उघडण्यासाठी कौशल्य विकास मंत्रालय आणि परिवहन मंत्रालय एकत्र मिळून काम करत असल्याचंही त्यांनी सांगितलं.

11 हजार किलोमीटरच्या रस्ते बांधणीचं टार्गेट

रस्ते आणि परिवनह मंत्रालयाने 8 जानेवारी रोजी 534 किलोमीटरचे नॅशनल महामार्गांची निर्मिती करून विक्रम प्रस्थापित केला आहे. आमच्या विभागाने एप्रिल 2020 पासून ते 15 जानेवारी 2021 दरम्यान 8,169 किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती केली आहे. त्याच वेगाने 31 मार्च पर्यंत 11 हजार किलोमीटरचे रस्ते बांधणीचं आमचं टार्गेट आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (nitin gadkari said check driver eyes to private hospital to rajnath singh)

संबंधित बातम्या:

महाराष्ट्राला एक इंचही जमीन मिळू देणार नाही; कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

धक्कादायक, केंद्रीय आरोग्य सचिवांच्या भावाचा गोळी लागलेला मृतदेह आढळला

जिथं भाजपानं भगदाड पाडलं, तिथंच ममतांनी रणशिंग फुंकलं; कोण चितपट होणार?

(nitin gadkari said check driver eyes to private hospital to rajnath singh)

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.