राजस्थानातील प्रवास होणार सुस्साट, 8 हजार कोटींच्या 18 महामार्गांचं गडकरींच्या हस्ते शुभारंभ
विकास कामांचा धडाका लावणारे केंद्रीय परिवहन आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आता राजस्थानमधील रस्ते चकाचक करण्याचा धडाका लावला आहे. (Nitin Gadkari to inaugurate, lay foundation stone for 18 highway projects in Rajasthan today)
नवी दिल्ली: विकास कामांचा धडाका लावणारे केंद्रीय परिवहन आणि रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आता राजस्थानमधील रस्ते चकाचक करण्याचा धडाका लावला आहे. गडकरी यांच्या हस्ते आज राज्यातील 18 राष्ट्रीय महामार्गांचा शिलान्यास करण्यात येणार आहे. राज्यात एकूण 1,127 किलोमीटर लांबीचे रस्ते बनविले जाणार असून त्यासाठी सुमारे 8,341 कोटी रुपये खर्च येणार आहे. (Nitin Gadkari to inaugurate, lay foundation stone for 18 highway projects in Rajasthan today)
केंद्र सरकारने देशभरात महामार्गांचं जाळं विणण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवसांपूर्वी नितीन गडकरी यांनी तेलंगणा येथील 13,000 कोटी रुपयांच्या रस्त्यांच्या योजनेचा शुभारंभ केला होता. तेलंगणात एकूण 765.66 किलोमीटरचे रस्ते निर्माण केले जाणार आहेत. गडकरी यांनी तेलंगणातील या 14 महामार्गांच्या प्रकल्पाचं ऑनलाईन उद्धाटन केलं होतं.
गेल्या सहा वर्षात तेलंगणातील केवळ 1,918 किलोमीटर लंबींच्या 59 रस्त्यांनाच परवानगी देण्यात आली होती. त्यासाठी 17,617 कोटी रुपये खर्च होणार होता, असं गडकरी यांनी सांगितलं. गडकरी यांनी रविवारी कर्नाटकातील राष्ट्रीय महामार्गाशी संबंधित 33 योजनांचा शुभारंभ केला. कर्नाटकातील महामार्ग तयार झाल्याने या भागाचा चौफेर विकास होईल, असं गडकरी यांनी सांगितलं होतं. (Nitin Gadkari to inaugurate, lay foundation stone for 18 highway projects in Rajasthan today)
कर्नाटकातही मोठे प्रकल्प
कर्नाटकातील हे 33 प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गांची लांबी 1200 किलोमीटरने वाढणार असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. या प्रकल्पासाठी 11 हजार कोटींचा खर्च येणार असल्याचंही त्यांनी स्पष्टे केलं. येत्या काळात केंद्र सरकार कर्नाटकात सुमारे 1,16,144 कोटींची गुंतवणूक करणार आहे. (Nitin Gadkari to inaugurate, lay foundation stone for 18 highway projects in Rajasthan today)
VIDEO | TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 9 AM | 24 December 2020 https://t.co/qh9SqS4Wbf @CMOMaharashtra @PMOIndia #topnews #fastnews
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 24, 2020
संबंधित बातम्या:
शेतकऱ्यांनी केंद्र सरकारचा बातचितचा प्रस्ताव फेटाळला, कृषी कायद्यांविरोधात शेतकरी ठाम
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना कोरोनाची लागण
नितीन गडकरी नेमकी कोणती रिस्क घेत नाहीत? वाचा ते काय म्हणाले…
(Nitin Gadkari to inaugurate, lay foundation stone for 18 highway projects in Rajasthan today)