गुजरात भाजपात नितीन पटेलांची बंडाची भाषा? नव्या मुख्यमंत्र्याबाबत मोठं वक्तव्य, वाचा का ट्रेंड होतंय #Nitin
अशातच ट्विटरवर #Nitin असं ट्रेंड होतंय. हा ट्रेंड आहे उपमुख्यमंत्री राहीलेल्या नितीन पटेल यांच्याबद्दल. कारण त्यांनी नेता निवडीच्या तोंडावर भाजपला गुजरातचा नवा मुख्यमंत्री कसा असावा याची आठवण करुन दिलीय. एका अर्थानं त्यांनी स्वत:चीच दावेदारी जगजाहीर करुन टाकलीय.
गुजरातमध्ये भाजपची नवा मुख्यमंत्री निवडण्यासाठी प्रक्रिया सुरु आहे. राजधानी गांधीनगरला भाजपाचे आमदार जमा झालेत. भाजपचे पर्यवेक्षक तोमर, प्रल्हाद जोशी हेही ह्या बैठकीत आहेत. ज्यांचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव चर्चेत आहे ते मनसुख मांडवीय, नितीन पटेलही यांनीही बैठकीला हजेरी लावलीय. गुजरातचा नवा मुख्यमंत्री कोण याची देशभरात उत्सुकता आहे. अशातच ट्विटरवर #Nitin असं ट्रेंड होतंय. हा ट्रेंड आहे उपमुख्यमंत्री राहीलेल्या नितीन पटेल यांच्याबद्दल. कारण त्यांनी नेता निवडीच्या तोंडावर भाजपला गुजरातचा नवा मुख्यमंत्री कसा असावा याची आठवण करुन दिलीय. एका अर्थानं त्यांनी स्वत:चीच दावेदारी जगजाहीर करुन टाकलीय.
नेमकं काय म्हणाले नितीन पटेल? गुजरातचा मुख्यमंत्री बदलतो पण उपमुख्यमंत्री मात्र तसाच राहातो. आनंदीबेन पटेल यांना हटवून जेव्हा रुपाणींना मुख्यमंत्री केलं त्यावेळेसही नितीन पटेल हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार होते. तेच मुख्यमंत्री होतील अशी चर्चा होती पण झाले रुपाणी. त्यावर नितीन पटेलांनी त्यावेळेस नाराजी व्यक्त केली होती. बऱ्याच काळापर्यंत त्यांनी उपमुख्यमंत्री होऊनही कार्यभार स्वीकारलेला नव्हता. शेवटी भाजप हायकमांडनं निर्वाणीचा इशारा दिला त्यावेळेस नितीन पटेल लाईनीत आले. आताही नितीन पटेल यांचं मुख्यमंत्रीपदासाठी नाव चर्चेत आहे. पण त्यांना केलं जाणार का याबद्दल त्यांनाही विश्वास नसावा. त्यामुळेच ऐन नेता निवडीच्या तोंडावर त्यांनी गुजरातचा मुख्यमंत्री कसा असावा तेच जाहीर करुन टाकलं. नितीन पटेल म्हणाले- गुजरातचा नवा मुख्यमंत्री हा अनुभवी, लोकप्रिय आणि सगळ्यांना सोबत घेऊन चालणारा तसच सर्वांना मान्य असलेलाही असावा.
नितीन पटेलांची बंडाची भाषा? नितीन पटेल हे पाटीदार समाजातूनच येतात. त्या समाजाची नाराजी वाढल्यामुळेच रुपाणींना हटवून नव्या मुख्यमंत्र्याचा शोध घेतला जातोय. नितीन पटेल हे कायम मुख्यमंत्रीपदाचे दावेदार म्हणून चर्चेत असतात. ते अनुभवी आहेत, त्यांना पाटीदार समाजाच्या पाठिंब्याचाही ते दावा करतात. सोशल मीडियावर त्यांचे काही चाहते, कार्यकर्ते सक्रिय झालेत. त्यांनीही नितीन पटेलांचं नाव पुढं केल्याचं दिसतंय. भाजपा हायकमांड मांडवीय किंवा प्रफुल्ल पटेल यांच्यापैकी कुण्या नव्या नेत्याला गुजरातचा मुख्यमंत्री करण्याच्या मनस्थितीत असल्याची चर्चा आहे. भाजपचे निर्णय तसे सरप्राईजिंग असतात. कर्नाटकात ते अनुभवायला आलेलं आहेच. तेच गुजरातमध्येही होऊ शकतं. आपल्याला डावललं जाण्याची भीती नितीन पटेलांना पुन्हा असावी, त्यामुळेच त्यांनी नवा मुख्यमंत्री सर्वांना मान्य असणारा असावा असं म्हटल्याचं जाणकारांना वाटतं.
कोण होणार मुख्यमंत्री? गुजरातच्या मुख्यमंत्र्याचा फैसला आता काही तासात होऊन जाईल. प्रामुख्यानं चार ते पाच नेत्यांची नावं चर्चेत आहेत. त्यात नितीन पटेल, पुरुषोत्तम रुपाला, मनसुख मांडवीय, गोवर्धन जदाफिया आणि लक्षद्विपचे प्रशासक प्रफुल्ल पटेल यांचं नाव चर्चेत आहे. ह्या सगळ्या नावांवर भाजपच्या नेता निवडीच्या बैठकीत चर्चा होईल आणि त्यानंतर एका नावावर सहमती बनवली जाईल. अर्थातच ह्या सगळ्या प्रक्रियेत मोदी-शाह यांचीच प्रमुख भूमिका आहे. मुख्यमंत्री हटवायचा ठरण्याआधीच कुणाला मुख्यमंत्री करायचं याचा निर्णय झाल्याचही जाणकार सांगतायत. त्यामुळे फक्त शिक्कामोर्तब करण्याची प्रक्रिया पार पाडली जातेय असही ट्विटरवर वाचायला मिळतंय.
भाजपात खांदेपालट, आपमध्येही मोठी घडामोड, पंजाब, गुजरात,उत्तराखंडमध्ये भाजप विरुद्ध आप?
गुजरातला आज नवा मुख्यमंत्री मिळणार, 3 नावं चर्चेत, भाजप आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत?