Nitish Kumar : प्रशांत किशोर विषयी प्रश्न विचारला तर CM नितीश कुमार यांचा पारा चढला, म्हणाले, ‘पीकेचं बोलणं म्हणजे…’
ज्या प्रकारे विरोधकांकडून जय्यत तयारी केली जात आहे, त्याच प्रमाणे सत्ताधारी भाजपही आता आत्मपरीक्षण करु लागले आहे. त्यांच्या हातातून निसटलेल्या जागा आणि मंत्र्यांच्या कामाचाही लेखाजोखा मांडला जाऊ लागला आहे. तर दुसरी मात्र विरोधक एकजूटीसाठी प्रयत्नशील असल्याचे दिसून येऊ लागले आहेत.
नवी दिल्लीः बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Bihar CM Nitish Kumar) दिल्ली वारीवर आहेत, त्यामुळे आता विरोध पक्षातील अनेक नेत्यांकडून केंद्रात बदलाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. आगामी काळातील निवडणुकांमध्ये कोणतीही कसर राहू नये यासाठी विरोधकांकडून (opposition party) आता जय्यत तयारी सुरू आहे. तर दुसरीकडे मात्र एका गोष्टीवर चर्चा होताना दिसून येऊ लागली आहे ती म्हणजे, विरोधी गटाकडून जी मोट बांधण्यात येईल त्यांच्या गटातील पंतप्रधान पदाचा चेहरा (Prime Minister Candidate) नेमका कोण असणार असा सवालही उपस्थित केला जात आहे.
नितीश कुमार दिल्ली दौऱ्यावर असल्यापासून राजकीय घडामोडींना आणि भेटीगाठींना आता प्रचंड वेग आला आहे. नितीश कुमारांनी तिसऱ्या दिवशीही चर्चेचा सिलसिला सुरूच ठेवला आहे. राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी विरोधकांची मोट बांधणे गरजेचे असल्याचे सांगितले आहे.
म्हणूनच विरोधक एकत्र
विरोधकांची एकजूट झाली तर मुख्य आघाडी म्हणूनच विरोधक एकत्र येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 2024 मधील होणाऱ्या निवडणुकांची वेळ आता जवळ येऊ लागली आहे, त्यामुळे सर्वच पक्ष आता कामाला लागले आहेत.
मुख्य दावेदार
दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना नितीश कुमारांनी सांगितले की, आगामी निवडणुकीनंतर विरोधकांची एकजूट हेच मुख्य दावेदार असतील मात्र आम्ही तिसरा पर्याय निर्माणच होऊ देणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.
तिसरा पर्याय…
यावेळी बिहारच्या राजकीय घडामोडींचा राष्ट्रीय राजकारणावर काय परिणाम होणार नाही असा सवाल प्रशांत किशोर यांनी उपस्थित केला होता. त्यावर बोलताना त्यांनी मुख्य आघाडी आणि तिसऱ्या आघाडीविषयीही स्पष्ट करुन प्रशांत किशोरांचा राजकारण हा त्यांचा धंदा असल्याचे सांगते त्यांचा सवालच मोडीत काढला होता.
प्रशांत किशोर म्हणतात…
नितीश कुमारांनी प्रशांत किशोर यांच्या सवालावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी प्रशांत किशोर यांच्या कोणत्याही वक्तव्याला काही अर्थ नाही असं सांगितले. ज्यावेळी प्रशांत किशोर राजकारणावर चर्चा करत असतात, त्यावेळी प्रशांत किशोरांना वाटतं की, राजकीय पक्षांनी भाजपबरोबर असले पाहिजे आणि भाजपला त्यांनी मदत केली पाहिजे.
त्यांचा तो ई-बिझनेस
नितीश कुमारांनी त्यांच्या ई-बिझनेसबद्दल सांगत राजकारण हा त्यांचा धंदा आहे, त्यामुळे त्यांच्या वक्तव्याकडे लक्ष देण्याची गरज नाही असंही त्यांनी स्पष्ट केले.
ते हेच नितीश कुमार
बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते सम्राट चौधरींनी त्यांच्यावर टीका करताना म्हणाले की, ज्या नितीश कुमारांनी राजकारणासाठी दिल्ली वारी केली आहे, त्याच नितीश कुमारांनी लालू प्रसाद यादवांना तुरुंगात घातले. तर राबडी देवी आणि तेजस्वी यादवांनाही अडचणीत आणले होते. तर आता मात्र त्यांच्या खांद्यावर बसून हे दिल्लीवारी करत असल्याची जोरदार टीका केली आहे.