दिसपूर: कोरोना पळून गेला आहे, तोंडाला मास्क लावण्याची गरज नाही, अशी मुक्ताफळे उधळणारे आसामचे आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा यांची बेताल बडबड सुरूच आहे. आता त्यांनी चक्क निवडणूक प्रचार रॅली आणि कोरोनाच्या संसर्गचा काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. (No link between poll rallies and surge in Covid cases: Sarma)
आरोग्यमंत्री हेमंत बिस्वा सरमा म्हणाले की, एका संशोधनानुसार ज्या ज्या ठिकाणी प्रचार रॅली झाली होती, तिथे कोरोनाचा एकही पॉझिटीव्ह रुग्ण आढळला नाही. तसेच सर्वच उमेदवारांना कोरोनाची लागणही झाली नाही. त्यामुळे आसाममधील निवडणूक प्रचार रॅली आणि कोरोना संसर्गाचा काहीच संबंध नाही हे सिद्ध होतं, असा अजब दावा सरम यांनी केला आहे.
काय म्हणाले सरमा?
आसामसह पाच राज्यात निवडणूका झाल्या. आसाममध्ये 27 मार्च, 1 एप्रिल आणि 6 एप्रिल रोजी तीन टप्प्यात मतदान झालं. यावेळी सर्वच राजकीय पक्षांनी 4 एप्रिलपर्यंत प्रचार केला होता. राज्यात फेब्रुवारीमध्ये 396 कोरोना रुग्ण सापडले होते. मार्चमध्ये ही संख्या 875 आणि 16 एप्रिलपर्यंत 4528 वर गेली आहे. आम्ही निवडणूक रॅलीमुळे कोरोनाचा संसर्ग वाढत नाही ना? याचं संशोधन सुरू केलं. मात्र, रॅली झालेल्या ठिकाणी एकही कोरोना रुग्ण आढळला नसल्याचं दिसून आलं. माझ्या मतदारसंघात सुवालकुची येथे 4 एप्रिल रोजी एका रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. त्या ठिकाणीही एकही रुग्ण आढळला नाही, असं सरमा यांनी सांगितलं.
बाहेरून आलेल्यांमुळे कोरोना
यावेळी सरमा यांनी बाहेरच्या राज्यातून आलेल्या लोकांनी राज्यात कोरोनाचा संसर्ग फैलावला असल्याचा दावा केला आहे. गुवाहाटी, डिब्रुगड, जोरहाट, तिनसुकिया आदी शहरांमध्ये, तसेच औद्योगिक ठिकाणी आणि रेल्वे स्थानके आणि विमानतळ असलेल्या भागात कोरोनाची संख्या अधिक असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
इतर राज्यांचे प्रमाणपत्र नामंजूर
यावेळी सरमा यांनी महत्त्वाची माहिती दिली. इतर राज्यातून येताना लोक कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट घेऊन येत आहेत. मात्र इतर राज्यांतून आणलेले हे कोविड निगेटिव्ह सर्टिफिकेट स्वीकारले जाणार नाहीत. विमानतळ आणि रेल्वे स्थानकात प्रत्येकाला रॅपिड अँटिजेन आणि आरटीपीसीआर टेस्ट करावीच लागणार आहे, असंही ते म्हणाले. (No link between poll rallies and surge in Covid cases: Sarma)
VIDEO : 4 मिनिटे 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | 7 AM | 18 April 2021https://t.co/bd0OpBj09T
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 18, 2021
संबंधित बातम्या:
‘कोरोना संपलाय, मास्क लावण्याची गरज नाही; मास्क लावले तर ब्युटीपार्लर्स कशी चालणार?’
रायपूरमध्ये हॉस्पिटलला आग, 5 जण दगावले, चौघांचा ऑक्सिजनअभावी मृत्यू
पंतप्रधानांनी महत्त्वाची बैठक बोलावली, रात्री 8 वाजता मंत्री आणि अधिकाऱ्यांशी संवाद
(No link between poll rallies and surge in Covid cases: Sarma)