Viral Video : जगात जुगाडू लोकांची कमी नाहीये. अनेक क्षेत्रात जुगाडू लोकांनी नाव कमवले आहे. पण हा जुगाड कधी कधी महागात देखील पडतो. भारताचे जुगाडू लोकांची कमी नाहीये. अनेक ठिकाणी लोकांना जुगाड करावाच लागतो. मोठे मोठे शास्त्रज्ञ आणि इंजिनियर्स देखील यामुळे हैराण होतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रेल्वेमधला हा व्हिडिओ आहे. एका तरुणाने रेल्वेत बसायला जागा नसल्याने असा जुगाड करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा हा प्रयत्न फसला.
व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक व्यक्ती मधल्या जागेत चादर बांधून झोपलेला दिसत होता. माणसाचा जुगाड सुरुवातीला सगळ्यांनाच आवडला. पण नंतर हा जुगाड फोल ठरला. चादर बांधल्यानंतर तो त्यात जाऊन झोपतो. पण काही सेकंदातच तो त्यामधून खाली पडतो. यावर अनेक लोकांना हसू अनावर होतं.
ना टिकट मिला, ना सीट मिला कुछ जुगाड़ लगाया वो भी फेल कर गया। बिहार से बाहर जाना मजबूरी है 🥹😓😢 pic.twitter.com/7rPIogb5BP
— छपरा जिला 🇮🇳 (@ChapraZila) December 20, 2023
एका व्यक्तीने ट्विटरवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ बिहारमधला असल्याचं बोललं जात आहे. व्हिडिओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देखील येत आहेत. एका यूजरने लिहिले – देशातील लोकसंख्या मोठी आहे, ट्रेन आणि जनरल डब्यांमध्ये त्यानुसार वाढ करण्यात आलेली नाही. दुसर्या यूजरने लिहिले – ही समस्या फक्त बिहारमध्येच नाही, कदाचित सर्वत्र आहे.