AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Farmers Protest : सरकारसोबतची 9 वी बैठकही निष्फळ, पुढची बैठक कधी?

मोदी सरकारच्या नव्या 3 कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांची 9 वी बैठकही निष्फळ ठरलीय.

Farmers Protest : सरकारसोबतची 9 वी बैठकही निष्फळ, पुढची बैठक कधी?
Follow us
| Updated on: Jan 15, 2021 | 6:34 PM

नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नव्या 3 कृषी कायद्यांविरोधातील शेतकरी आंदोलनावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांची 9 वी बैठकही निष्फळ ठरलीय. बैठकीत कृषी कायद्यावर तोडगा निघाला नाही. शेतकऱ्यांनी तिन्ही कायदे रद्द झाल्याशिवाय आंदोलनामधून माघार नाही, अशी ठाम भूमिका घेतलेली आहे. तर दुसरीकडे सरकारही मागे हटण्यास तयार नसल्याचं दिसतंय. त्यामुळे हे आंदोलन सुरुच राहणार असल्याचं स्पष्ट झालंय. आता शेतकरी आणि केंद्र सरकारमधील पुढील बैठक 19 जानेवारीला दुपारी 12 वाजता होणार आहे (No solution in meeting between Farmers and Government over Farm Laws).

केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांची 9 वी बैठकही झाली. मात्र, ही बैठकही कोणत्याही तोडग्याविनाच संपली. मात्र, शेतकरी आपल्या भूमिकेवर अगदी ठाम आहेत. “सरकार आम्हाला थकवण्याचा प्रयत्न करत आहे. आम्ही थकणार नाही. सरकारने तोडगा काढत कृषी कायदे रद्द न केल्यास हे शेतकरी आंदोलन 6 महिन्यांपेक्षा जास्त काळ सुरु राहिल,” असा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय.

शेतकरी आंदोलनाचा आज (15 जानेवारी) 51 वा दिवस आहे. दरम्यान, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात पंजाबमधील राज भवनाकडे जाणाऱ्या काँग्रेसच्या मार्चवर पोलिसांनी कारवाई केली. काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी पाण्याच्या फवाऱ्याचा उपयोग केला. यावेळी काही आंदोलनकर्त्यांना ताब्यातही घेण्यात आले.

संबंधित बातम्या :

Farmers Protest | काँग्रेसचा देशभरात ‘शेतकरी अधिकार दिवस’, राजभवन आणि LG ना घेराव घालणार

हरियाणातील भाजप सरकार संकटात?, जेजेपीचे आमदार पक्ष सोडण्याच्या तयारीत?

चार सदस्यांची कमिटी शेतकरी आंदोलन थांबवण्यासाठी केलेला फार्स ठरु नये: सतेज पाटील

व्हिडीओ पाहा :

जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव
जळगाव हादरलं! मुलीने प्रेमविवाह केला म्हणून बापानेच घेतला लेकीचा जीव.
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग
एनआयएकडून पहलगाम हल्ल्याच्या तपासाला वेग.
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी
ठाकरे बंधु एकत्र येणार? आता थेट मातोश्रीबाहेरच बॅनरबाजी.
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा
दहशतवाद्यांना कठोर उत्तर देऊ; पंतप्रधान मोदींचा पाकला थेट इशारा.
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त
दहशतवाद्यांना सैन्याचा दणका! 9 दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त.
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती
..पाकिस्तानातून आले होते, कसे समजले? -स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती.
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव
पाकिस्तानी नागरिकांवरून महायुतीत समन्वयाचा अभाव.
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट
व्यापार ठप्प झाला, जनजीवन विस्कळीत झालं; पहलगाममध्ये शुकशुकाट.
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला
'काही लोक घरातून बाहेर पडले की..', नाव न घेता शिंदेंचा ठाकरेंना टोला.
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती
'१३० अण्वस्त्रे फक्त भारतासाठी..', पाकिस्तानची पुन्हा एकदा डरपोक्ती.