गायीला कुत्रा चावला, त्याच गायीच दूध प्याल्यानंतर महिलेचा मृत्यू, तपासात काय समोर आलं?
असा मृत्यू झालाय की, सगळेच हादरुन गेलेत. इथे एक महिला गायीच दूध प्याली, त्यानंतर तिला उल्ट्यांचा त्रास सुरु झाला. तातडीने महिलेला रुग्णालयात नेण्यात आलं. गंभीर स्थितीमुळे तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. पण तिथे महिलेचा मृत्यू झाला.

असं म्हणतात, मृत्यू कधीही, कुठेही आणि कसाही येऊ शकतो. उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये एका महिलेच्या मृत्यूने सगळेच हैराण झालेत. असा मृत्यू झालाय की, सगळेच हादरुन गेलेत. इथे एक महिला गायीच दूध प्याली, त्यानंतर तिला उल्ट्यांचा त्रास सुरु झाला. तातडीने महिलेला रुग्णालयात नेण्यात आलं. गंभीर स्थितीमुळे तिला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं. पण तिथे महिलेचा मृत्यू झाला. तपासात असं समोर आलं की, महिला ज्या गायीच दूध प्याली होती, त्या गायीला रेबीज झालेला. गायीला एक भटका कुत्रा चावला होता. त्यामुळे गायीला रेबीज झाला.
रेबीजच इंफेक्शन गायीच्या दूधातून महिलेच्या शरीरात उतरलं. त्यामुळे महिलेचा मृत्यू झाला. थोरा गावातील हे प्रकरण आहे. महिला रेबीजने संक्रमित झालेल्या गायीच दूध प्याली होती. त्यामुळे तिचा मृत्यू झाला. सीमा (40) असं मृत महिलेच नाव आहे. या गायीने दोन महिन्यापूर्वी बछड्यांना जन्म दिला होता. दीड महिन्यापूर्वी गायीमध्ये रेबीजची लक्षण दिसली. पुश चिकित्काने गायीला रेबीज झाल्याच स्पष्ट केलं.
सीमाला पाणी आणि उजेडाची भिती वाटू लागली
गाय मालकाच्या कुटुंबाने रेबीजला प्रतिबंध करणारी लस घेतली. सोमवारी रात्री सीमाला पाणी आणि उजेडाची भिती वाटू लागली. उल्टीचा त्रास सुरु झाल्यानंतर नातेवाईक तिला रुग्णालयात घेऊन गेले. अनेक रुग्णालयात उपचारासाठी फिरावं लागलं. सरकारी रुग्णालयातून जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आलं.
या घटनेमुळे किती लोकांनी रेबीजची लस घेतली?
नंतर दिल्लीच्या सफदरजंग रुग्णालयात रेफर केलं. कुठल्याही रुग्णालयाने रेबीजची तपासणी केली नाही, असा आरोप आहे. बसंतकुंज येथील रुग्णालयाने रेबीज असल्याच सांगून घरी पाठवून दिलं. गुरुवारी सीमाचा मृत्यू झाला. सीमाला तीन मुली आणि एक मुलगा आहे. तिच्या मृत्यून कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलाय. या घटनेनंतर गावातल्या दहा लोकांनी खबरदारी म्हणून रेबीच प्रतिबंधक लस घेतली आहे.