Ginger Price : आता चहा होणार बेचव! टोमॅटोनंतर अद्रक महागली

Ginger Price : चढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांच्या ताटातून टोमॅटो जवळपास बाद झाला आहे. इतर पण भाज्यांचा क्रमांक लागला आहे. आता चहाला रंगत आणणाऱ्या अद्रकीचा भाव पण वधारला आहे. इतकी आहे किंमत..

Ginger Price : आता चहा होणार बेचव! टोमॅटोनंतर अद्रक महागली
Follow us
| Updated on: Jul 21, 2023 | 6:22 PM

नवी दिल्ली | 21 जुलै 2023 : चढत्या किंमतींमुळे सर्वसामान्यांच्या ताटातून टोमॅटो (Tomato Price) जवळपास बाद झाला आहे. इतर पण भाज्यांचा क्रमांक लागला आहे. आता चहाला रंगत आणणाऱ्या अद्रकीचा भाव (Ginger Price Hike) पण वधारला आहे. अद्रकीने सर्वसामान्यांना झटका दिला. पावसाने ओढ दिल्यास अद्रकीवर मोठा परिणाम होईल आणि येत्या काही दिवसात सामान्य नागरिकांच्या जीभेची चव पण हिरावल्या जाईल. पावसाळ्यात अद्रकीच्या चहावर अनेक जण फिदा असतात. पण अद्रकीचे भाव वाढल्याने चहातून लवकरच अद्रकीची चव गायब होण्याची शक्यता आहे. अद्रकीचा दर वाढण्यामागची कारणं तरी काय, किती वाढला भाव?

इतका वधारला भाव

घरातील बजेट अगोदरच कोलमडलेले असताना आता अद्रकीने पण झटका दिला. अद्रकीचे भाव अचानक वाढले आहेत. अद्रक 400 रुपये किलोवर पोहचली आहे. कर्नाटकच्या खुल्या बाजारात एक किलो अद्रकचा भाव 300 ते 400 रुपयांदरम्यान आहे. कर्नाटक हे देशातील दुसरे सर्वात मोठे अद्रक उत्पादक राज्य आहे. आर्थिक वर्ष 2022 मध्ये मध्य प्रदेशात विक्रमी अद्रक उत्पादन झाले होते.

हे सुद्धा वाचा

किंमती सूसाट

कर्नाटक राज्यातील म्हैसूर जिल्हात अद्रकीला विक्रमी भाव मिळाला आहे. 60 किलो अद्रकीच्या पोत्याला पूर्वी कमी भाव होता. व्यापारी गेल्यावर्षी 2022 मध्ये या पोत्यासाठी 2,000 ते 3,000 रुपये मोजत होते. आता हाच भाव 11,000 रुपयांवर पोहचला आहे.

शेतकरी मालामाल

टोमॅटोने पश्चिम आणि दक्षिण भारतातील अनेक शेतकऱ्यांना लॉटरी लागली. ते एका महिन्यातच करोडपती झाले. आता अद्रक उत्पादक शेतकऱ्यांना सुगीचे दिवस आले आहेत. कर्नाटकमधील म्हैसूर आणि मलनाड जिल्ह्यातील अद्रक उत्पादकांना हा बदल वरदान ठरला आहे. गेल्या वर्षीपेक्षा त्यांना अद्रकीमुळे मोठा फायदा झाला आहे. नवीन अद्रकीला सुद्धा जोरदार भाव मिळत आहे.

दशकात वाढले भाव

कर्नाटकातील रायथा संघाचे, म्हैसूर जिल्हाध्यक्ष होसूर कुमार यांनी दहा वर्षांत पहिल्यांदाच इतका जोरदार भाव मिळाल्याचे सांगितले. ते स्वतः अद्रक उत्पादक शेतकरी आहेत. त्यांच्या मते, गेल्या दहा वर्षांत पहिल्यांदाच इतका मोठा भाव मिळाला आहे.

चोरीच्या घटना वाढल्या

टोमॅटोच्या किंमती भडकल्यानंतर देशात टोमॅटो चोरीच्या अनेक घटना समोर आल्या. शेतकऱ्यांना रात्री शेतात खडा पहारा द्यावा लागत आहे. आता हीच वेळ अद्रक उत्पादक शेतकऱ्यांवर आली आहे. देशभरात अद्रक उत्पादकांना शेतात राखण ठेवावी लागत आहे. केरळ आणि कर्नाटकातील शेतकरी अद्रक चोरांमुळे त्रासले आहेत.

चोरी पण लाखांमध्ये

कर्नाटकातील एका शेतकऱ्याने त्याच्या शेतातील 1.8 लाख रुपयांची अद्रक चोरीची तक्रार दिली आहे. तर होरलावडी येथील शेतकऱ्याने 10,000 रुपयांच्या अद्रक चोरीची फिर्याद दिली आहे. बिलिगेर पोलीस ठाण्यात त्याने तक्रार दिली. शेतकऱ्यांनी आता शेतात पण सीसीटीव्ही बसविण्यास सुरुवात केली आहे.

उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप
उद्धव यांचा इगो दुखावल्याने मेट्रोचं काम थांबलं, फडणवीस यांचा आरोप.
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा
चार दिवस सासूचे,पण सुनेचं चार दिवस यायचे की नाही, काय म्हणाले अजितदादा.
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी
पवार यांनी बेजबाबदार विधानं करणे थांबवावे, लक्ष्मण हाके यांची मागणी.
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे
'कोणी माई का लाल लाडकी बहीण योजना...,' काय म्हणाले एकनाथ शिंदे.
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप
कॉंग्रेस तरुणांना ड्रग्जच्या नशेत ढकलत आहे, मोदींनी केला मोठा आरोप.
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका
अग्निवीर म्हणजे पेन्शन संपविण्याची योजना, राहुल गांधी यांची टीका.
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे
येत्या दीड महिन्यात गद्दार बेकार होणार आहेत, पण...काय म्हणाले ठाकरे.
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई
महाराष्ट्रात 3 ठिकाणी NIA आणि ATS ची संयुक्त कारवाई.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर, पोहरादेवी येथे जाहीर सभ.
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा
दळभद्रीपणामुळे राज्याची बदनामी..दावोस दौऱ्यावरून रोहित पवारांचा निशाणा.