मोदी-शहांकडून देशाच्या लोकशाहीवर घाव, पेगासस प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
पेगासस प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पेगाससचं हत्यार देशद्रोही आणि दहशतवाद्यांच्या विरोधात वापरलं जायला हवं होतं. (Rahul Gandhi)
नवी दिल्ली: पेगासस प्रकरणावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. पेगाससचं हत्यार देशद्रोही आणि दहशतवाद्यांच्या विरोधात वापरलं जायला हवं होतं. पण हे हत्यार देशाविरोधातच वापरलं जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देशाच्या लोकशाही आत्म्यावरच घाव घातला आहे, असा घणाघाती हल्ला राहुल गांधी यांनी चढवला आहे. (Not Ready for Compromise, Says Rahul Gandhi)
पार्लमेंट चेंबरमध्ये आज काँग्रेससह 14 विरोधी पक्षांची बैठक पार पडली. त्यानंतर राहुल गांधींसह या 14 पक्षांचे नेते मीडियाला सामोरे गेले. यावेळी राहुल यांनी केंद्रातील भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढवला. देशातील सर्व विरोधक एकवटले आहेत. सर्व पक्षाचे नेते आहेत. आमचा आवाज संसदेत दाबला जात आहे. आमचा केवळ एकच प्रश्न आहे. केंद्र सरकारने पेगाससची खरेदी केली की नाही. त्यांनी होय किंवा नाही या शब्दात उत्तर द्यावं. केंद्र सकारने देशातील नागरिकांची हेरगिरी केली की नाही, याचंही उत्तर होय किंवा नाही या शब्दात द्यावी. आम्हाला हे जाणूनच घ्यायचं आहे, असं राहुल गांधी म्हणाले.
चर्चाच करणार नाही, असं केंद्र सरकार म्हणतंय
पेगाससवर संसदेत चर्चा होणार नाही, असं आम्हाला केंद्र सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे. मोदी सरकारने तुमच्या मोबाईलमध्ये एक शस्त्र टाकलं आहे. माझ्याविरोधात या हत्याराचा वापर केला गेला. सुप्रीम कोर्टाच्या विरोधात त्या हत्याराचा वापर केला. प्रेस, कार्यकर्ते आणि इतरांच्या विरोधातही या हत्याराचा वापर करण्यात आला. त्यावर संसदेत चर्चा का होत नाही? हा प्रश्न आहे. आम्ही संसदेत गोंधळ घालत आहे असा आरोप लावला जात आहे. पण आम्ही तसं करत नाही. आम्ही आमची जबाबदारी पार पडत आहोत. केवळ काँग्रेस नेता म्हणून नव्हे तर सर्वच नेते हे सांगतील, असंही ते म्हणाले.
तर कधीच चर्चा होणार नाही
हे हत्यार आपल्या देशाविरोधात वापरलं गेलं. या हत्याराचा वापर दहशतवाद्यांच्या विरोधात, देशद्रोहींच्या विरोधात करायला हवा होता. पण लोकशाहीच्या विरोधात त्याचा वापर का केला जात आहे. आपल्याच देशाच्या विरोधात हा वापर का केला जात आहे? असा सवाल करताना आम्ही आता पेगाससवर चर्चा करणार नाही असं म्हटलं तर पेगासस प्रकरण दाबलं जाईल. त्यावर पुन्हा चर्चा होणार नाही. माझ्यासाठी हे प्रायव्हसीचं प्रकरण नाहीच. आमच्यासाठी हे राष्ट्रवादाचं प्रकरण आहे. हे हत्यार लोकशाहीच्या विरोधात वापरलं आहे. हा राष्ट्रद्रोही प्रकरण आहे. मोदी आणि शहांनी देशाच्या लोकतांत्रिक आत्म्यावर घाव घातला आहे, त्यामुळे आम्हाला त्यावर चर्चा हवी आहे. त्यामुळेच चर्चा झाल्याशिवाय आम्ही कुठेच जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
14 पक्ष एकटवले
दिल्लीत झालेल्या या बैठकीला काँग्रेस, डीएमके, राष्ट्रवादी, शिवसेना, राजद, सपा, सीपीआयएम, सीपीआय, नॅशनल कॉन्फरन्स, आम आदमी पार्टी, इंडियन युनियन मुस्लिम लीग, आरएसपी, केरळा काँग्रेस (एम) आणि व्हिसीके पार्टीचे नेते उपस्थित होते. या बैठकीला शिवसेनेकडून संजय राऊत उपस्थित होते. तर राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे उपस्थित होते. यावेळी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पेगाससप्रकरणी कोणतीही तडजोड केली जाणार नाही. सरकारला यावर उत्तर द्यावच लागेल, असा इशारा दिला. (Not Ready for Compromise, Says Rahul Gandhi)
Sitting with the entire opposition is extremely humbling. Amazing experience, wisdom and insight in everyone present.#United pic.twitter.com/w74YRuC3Ju
— Rahul Gandhi (@RahulGandhi) July 28, 2021
संबंधित बातम्या:
कोणत्याही गोष्टीवर उडपटांग बोलणं म्हणजे अभ्यास नाही; राऊतांचा फडणवीसांना टोला
(Not Ready for Compromise, Says Rahul Gandhi)