AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Tomato flu: आता देशात लहानग्यांना टोमॅटो फ्लूचा धोका, केरळातून देशाच्या इतर भागात आजार पसरण्याची भीती, काळजी घेण्याचे आवाहन

हा आजार झाल्यानंतर काही दिवसांनी रुग्ण बरा होतो, मात्र अद्याप या फ्ल्यूवर कोणतेही औषध नसल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. तसेच या टोमटो फ्ल्यूची लागण अत्यंत सांसर्गिक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

Tomato flu: आता देशात लहानग्यांना टोमॅटो फ्लूचा धोका, केरळातून देशाच्या इतर भागात आजार पसरण्याची भीती, काळजी घेण्याचे आवाहन
आता टोमॅटो फ्ल्यूचा धोकाImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Aug 20, 2022 | 5:00 PM
Share

नवी दिल्ली- कोरोना, मंकीपॉक्सनंतर आता एका नव्या आजाराने देशात डोकं वर काढलेलं आहे. या आजाराचे नाव आहे टॉमेटो फ्ल्यू. (Tomato flue) केरळ (kerala)आणि ओडिशात (Odisha)याचे रुग्म गेल्या काही दिवसांपासून सापडले आहेत. या नव्या आजारात हात, पाय, तोंडावर आणि शरिराच्या इतर भागांवर लाल पुळ्या होतायेत. या लाल पुळ्या टोमॅटो सारख्या दिसत असल्यामुळे या आजाराला टोमॅटो फ्लू असे नाव पडलेले आहे. पहिल्यांदा या आजाराचे रुग्म केरळमध्ये सापडले होते. केरळच्या कोल्लाम येथे ६ मेच्या दरम्यानच्या काळात ८२ लहान मुलांना या आजाराची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यातही पाच वर्षांपेक्षा लहान मुलांनाच या आजाराची लागम झाल्याचे समोर आले होते. लँसेटने आपल्या अहवालात या आजाराबाबत सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्यात त्यांनी लिहिले आहे की – कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात असताना, त्याला कसे सामोरे जायचे याचा विचार करण्यात येत आहे. त्याचवेळी टोमॅटो फ्लू या नव्या व्हायरसचा प्रभाव देशात वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

काय आहेत टोमॅटो फ्लूची लक्षणे

विशेषता लहान मुलांना त्यातही पाच वर्षांखालील मुलांना या आजाराची लागण होण्याची जास्त शक्यता आहे. यात लहान मुलांना ताप येणे, सांधेदुखी वाटणे, कणकण जाणवणे, अपचनाचा त्रास होणे, उलट्या होणे यासारखी या आजाराची लक्षणे असल्याचे सांगण्यात आले आहे. या आजारात रुग्णाच्या अंगावर लाल पुळ्या निर्माण होतात. त्या पुळयांचा रुग्णांना त्रास होतो. शरिरभर पसरलेल्या या पुळ्या टोमॅटोच्या आकाराएवढ्या होण्याची शक्यता असते. त्यामुळे त्याला टोमॅटो फ्लू असे नाव पडले आहे.

केरळच्या शेजारच्या राज्यांना विशेष काळजी घेण्याचा आवाहन

केरळमध्ये हा आजार तीन जिल्ह्यांत पसरलेला दिसतो आहे. लहान मुलांना याची लागण होत असल्याचे समोर आले आहे. अशा स्थितीत केरळच्या शेजारी असेलल्या तामिळनाडू, कर्नाटक या राज्यांना सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या आजाराची लागण ओडिशा राज्यातील २६ मुलांनाही झाल्याची माहिती आहे. आत्तापर्यंत केरळ, तामिळनाडू आणि ओडिशा वगळता इतर देशात या आजाराचा प्रादुर्भाव झालेला नाही. मात्र इतर राज्यांनीही याबाबत दक्षता बाळगण्याची गरज व्यक्त होते आहे.

टोमॅटो फ्ल्यूवर औषध नाही

हा आजार झाल्यानंतर काही दिवसांनी रुग्ण बरा होतो, मात्र अद्याप या फ्ल्यूवर कोणतेही औषध नसल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे. तसेच या टोमटो फ्ल्यूची लागण अत्यंत सांसर्गिक असल्याचेही सांगण्यात आले आहे.

नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी
दमानियांचा सुषमा अंधारे यांना पाठिंबा; शिंदेंच्या राजीनाम्याची मागणी.
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला
सनसनाटी निर्माण करण्याचा केविलवाणा प्रयत्न! शंभूराज देसाईंचा टोला.
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.