देशातील एनएसजी या बलाढ्य फोर्सच्या कमांडरला आयसीयू बेड मिळाला नाही; रस्त्यातच प्राण सोडले
देशातील सर्वात बलाढ्य ब्लॅक कॅट कमांडो अर्थात एनएसजी फोर्सच्या एका ग्रुप कमांडरला आयसीयू बेड न मिळाल्याने त्यांनी वाटेतच प्राण सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. (nsg group commander death due to not even found icu bed)
नवी दिल्ली: देशातील सर्वात बलाढ्य ब्लॅक कॅट कमांडो अर्थात एनएसजी फोर्सच्या एका ग्रुप कमांडरला आयसीयू बेड न मिळाल्याने त्यांनी वाटेतच प्राण सोडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बीरेंद्र कुमार झा असे या ग्रुप कमांडरचं नाव आहे. त्यांना तात्काळ प्रभावाने आयसीयू बेड न मिळाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली आहे. (nsg group commander death due to not even found icu bed)
बीरेंद्र कुमार झा यांना कोरोनाची लागण झाल्याने 22 एप्रिल रोजी अर्ध सैनिक दलाच्या नोएडा येथील रेफरल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांची प्रकृती स्थिर होती. परंतु 4 मे रोजी सायंकाळी सहा वाजता अचानक त्यांनीच तब्येत बिघडली. त्यांची ऑक्सिजन लेव्हल एकदम कमी झाली.
बेडच्या शोधात पाच तास वाया
त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करणे आवश्यक होते. मात्र रेफरल हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेड रिकामे नव्हते. त्यामुळे त्यांना दुसऱ्या रुग्णालयात नेण्याचा सल्ला देण्यात आला. त्यामुळे लगेच दिल्लीतील रुग्णालयात आयसीयू बेडची शोधाशोध सुरू झाली. या शोधाशोधीत तब्बल पाच तास गेले. या दरम्यान बीरेंद्र कुमार झा यांची प्रकृती अजूनच नाजूक झाली.
रस्त्यातच प्रकृती बिघडली
सुरुवातीला रात्री 11 वाजता त्यांना मॅक्स सुखदेव विहारमध्ये नेण्यात आले. तिथेही बेड रिकामे नव्हते. त्यानंतर त्यांना एनसजी कमांडर ग्रुपच्या दिल्लीतील फोर्टीस रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, त्यांची प्रकृती एवढी बिघडली की रुग्णालयात पोहोचता पोहोचता त्यांचा मृत्यू झाला. दिल्लीत कोरोनाच संसर्ग प्रचंड वाढला आहे. त्यामुळे दिल्लीत ऑक्सिजन बेडची कमतरता आहे. तसेच सर्व रुग्णालये भरल्याने लोकांना बेड मिळणंही मुश्किल झालं आहे. (nsg group commander death due to not even found icu bed)
VIDEO | सुपरफास्ट 100 न्यूज | 100 SuperFast News | 8 AM | 5 May 2021 https://t.co/cwy9wZYYbc #MorningBulletin | #MorningHeadlines | #TV9Marathi | #BreakingNews | #LatestUpdates
— TV9 Marathi (@TV9Marathi) May 5, 2021
संबंधित बातम्या:
कोरोनामुक्त झाल्यानंतर अनेकांना 15 दिवसांमध्ये पुन्हा लागण, Immunity Escape म्हणजे काय ?
उत्तर प्रदेशात ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, दोघांचा जागीच मृत्यू, पाच जण जखमी
(nsg group commander death due to not even found icu bed)