अयोध्येतील पराभवानंतर मोदी सरकारचा मोठा निर्णय, अयोध्यात होणार आता…

ayodhya ram mandir: अयोध्येत राम मंदिराचे निर्माण झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे राम मंदिरची सुरक्षा व्यवस्था कठोर करण्याकडे केंद्र सरकारने लक्ष दिले आहे. अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली.

अयोध्येतील पराभवानंतर मोदी सरकारचा मोठा निर्णय, अयोध्यात होणार आता...
ayodhya ram mandir
Follow us
| Updated on: Jun 12, 2024 | 2:39 PM

लोकसभा निवडणुकीत भाजपला उत्तर प्रदेशात धक्का बसला आहे. राम मंदिर पूर्ण झाल्यानंतर उत्तर प्रदेशातील लोकांनी भाजपला नकारले. अयोध्येतही भाजप उमेदवार पराभूत झाला. त्यानंतर आता मोदी 3.0 सरकारचे कामकाज सुरु होताच अयोध्येसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. अयोध्येत नॅशनल सिक्यूरिटी गार्डचे (NSG) हब बनवण्यात येणार आहे. अतिरेक्यांकडून होणारा धोका लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अतिरेकी हल्ल्यांमुळे देशातील इतर संवेदनशील ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

अयोध्या एनएसजी हब होणार

अयोध्येत राम मंदिराचे निर्माण झाल्यानंतर सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहे. त्यामुळे राम मंदिरची सुरक्षा व्यवस्था कठोर करण्याकडे केंद्र सरकारने लक्ष दिले आहे. अयोध्येत 22 जानेवारी 2024 रोजी राम मंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली. त्यानंतर देशभरातून येणाऱ्या भाविकांची गर्दी प्रचंड वाढली आहे. रोज दीड लाखांपेक्षा जास्त भाविक येत आहेत. त्यामुळे सुरक्षा व्यवस्था कठोर करण्याकडे पावले उचलण्यात आली आहे. आता केंद्र सरकारने अयोध्येत एनएसजी हब बनवण्यासाठी योजना तयार केली आहे. एनसीजीमध्ये ब्लॅक कॅट कमांडो तैनात असतात.

एनएसजी तैनात करण्याचा निर्णय

केंद्र सरकारने अयोध्येत एनएसजी कमांडो तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. अयोध्येत येणाऱ्या रामभक्तांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय गृहमंत्रालयाने घेतला आहे. तसेच दहशतवादी हल्ल्यासारखा परिस्थितीचा सामना करण्यासाठी या योजनेवर काम करण्यात आले आहे. अयोध्या मंदिराच्या सुरक्षेचे नेतृत्व एनएसजीकडे देण्यात येणार आहे. एनएसजी कोणत्याही प्रकारचे ऑपरेशन करण्यासाठी नेहमी तयार असते.

हे सुद्धा वाचा

सध्या अयोध्येची सुरक्षा एसएसएफकडे

केंद्र सरकारकडून अयोध्येत एनएसजी नियुक्तीची पूर्ण तयारी केली गेली आहे. यासंदर्भात राज्य सरकारला माहिती दिली आहे. एनएसजी हब करण्यासाठी जमीन अधिग्रहण करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सध्या अयोध्येची सुरक्षा एसएसएफकडे दिली आहे. या कमांडोना एनएसजीकडून प्रशिक्षण दिले गेले आहे. स्पेशल फोर्सचे 200 कमांडो अयोध्याची सुरक्षा पाहत आहे.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.