Rajagopala Chidambaram passes away: पोखरणमध्ये यशस्वी अणूचाचणी करुन जगाला हादरवणारे शास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल यांचे निधन

Who Is Rajagopala Chidambaram: डॉ.राजगोपाल चिदंबरम यांनी १९७४ मध्ये पोखरणपर्यंत प्लुटोनियम घेऊन जाणाऱ्या लष्कराच्या ट्रकमध्ये प्रवास केला होता. ते पोखरण अण्वस्त्र परिक्षण केंद्रात मुख्य वास्तूकार होते. इंडिया रायजिंग मेमोयर ऑफ ए साइंटिस्टमध्ये त्यांनी यासंदर्भात खुलासा केला होता.

Rajagopala Chidambaram passes away: पोखरणमध्ये यशस्वी अणूचाचणी करुन जगाला हादरवणारे शास्त्रज्ञ डॉ. राजगोपाल यांचे निधन
Rajagopala Chidambaram passes away
Follow us
| Updated on: Jan 05, 2025 | 2:15 PM

Rajagopala Chidambaram Death: भारताला अण्वस्त्र संपन्न राष्ट्र बनवण्यासाठी महत्वाची भूमिका निभावणारे ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ पद्मविभूषण राजगोपाल चिदंबरम यांचे निधन झाले. ते ८८ वर्षांचे होते. १९७४ आणि १९९८ मध्ये पोखरममध्ये अणूचाचणी करण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये शनिवारी पहाटे त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भावूक पोस्ट लिहिली आहे.

विविध पदांवर केले काम

११ नोव्हेंबर १९३६ मध्ये चेन्नईत जन्मलेले डॉ.राजगोपाल चिदंबरम यांनी भारताला अण्वस्त्र संपन्न राष्ट्र करण्यात मोलाची भूमिका निभावली. त्यांनी भारत सरकारचे वैज्ञानिक सल्लागार म्हणूनही काम केले. त्यांना १९७५ मध्ये पद्मश्री तर १९९९ मध्ये पद्मभूषण पुरस्कार देण्यात आला. ते भाभा अणू संशोधन केंद्र (वीएआरसी), अणूउर्जा आयोग (एईसी)चे अध्यक्षही होते. अणूउर्जा विभागाचे सचिव म्हणूनही त्यांनी काम केले.

हे सुद्धा वाचा

लष्कराच्या ट्रकमधून पोखरणपर्यंत प्रवास

डॉ.राजगोपाल चिदंबरम यांनी १९७४ मध्ये पोखरणपर्यंत प्लुटोनियम घेऊन जाणाऱ्या लष्कराच्या ट्रकमध्ये प्रवास केला होता. ते पोखरण अण्वस्त्र परिक्षण केंद्रात मुख्य वास्तूकार होते. इंडिया रायजिंग मेमोयर ऑफ ए साइंटिस्टमध्ये त्यांनी यासंदर्भात खुलासा केला होता.

नरेंद्र मोदी यांची भावूक पोस्ट

डॉ.राजगोपाल चिदंबरम यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र शोक प्रकट केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, डॉक्टर राजगोपाल चिदंबरम यांच्या निधनाबद्दल खूप दु:ख झाले आहे. ते भारताच्या अण्वस्त्र कार्यक्रमात प्रमुख शास्त्रज्ञांमध्ये होते. त्यांनी देशातील वैज्ञानिक क्षमता मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले. त्यांची संपूर्ण देश कृतज्ञतेने आठवण करेल. त्यांच्या कामापासून भाव पिढी नेहमी प्रेरणा घेत राहणार आहे.

डीएईने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आम्ही अत्यंत दुःखाने कळवत आहोत की, प्रख्यात भौतिकशास्त्रज्ञ आणि भारतातील सर्वात प्रख्यात वैज्ञानिकांपैकी एक डॉ. राजगोपाल चिदंबरम यांचे ४ जानेवारी २०२५ निधन झाले. भारताच्या वैज्ञानिक आणि सामरिक क्षमतांमध्ये डॉ. चिदंबरम यांचे अद्वितीय योगदान आहे. तसेच विज्ञान आणि तंत्रज्ञानातील त्यांचे दूरदर्शी नेतृत्व नेहमीच स्मरणात राहील.

मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा
मुंडेंना अजितदादा पाठिशी घालताय? बीड प्रकरणासंदर्भात धसांचा मोठा दावा.
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला
राजीनाम्याची मागणी सुरू असताना धनंजय मुंडे तडकाफडकी दादांच्या भेटीला.
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?
बीड प्रकरणात चौकशी सुरू, तर मुंडेंचा राजीनामा कशाला? भुजबळांचं मत काय?.
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?
मुंबईतील ताज हॉटेलमध्ये एकाच नंबरच्या 2 कार; भानगड नेमकी काय?.
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी
बीड प्रकरणातील मोठी बातमी, SIT पथकातून तिघांची हकालपट्टी.
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?
चीनमधला नव्या HMPV व्हायरसची भारतात एन्ट्री, पहिला रूग्ण कुठं आढळला?.
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला..
खंडणी डीलमध्ये सहभाग? धसांनी उल्लेख केलेला 'तो' नितीन बिक्कड म्हणाला...
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र
'शक्यता नाकारता येत नाही...', बीड प्रकरणावरून पवारांचं CM यांना पत्र.
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं
'भक्तांना भिकारी म्हणतात मग तुम्हाला.', अंधारेंनी सुजय विखेंना सुनावलं.
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?
संतोष हत्येतील आरोपी फरार झाले कसे? सरपंचाची हत्या करून कुठं मुक्कामी?.