AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nupur Sharma : ‘नुपुर शर्मांच्या केसालाही धक्का लागला तर तुम्ही 100 कोटी लोकांना झेलू शकणार नाहीत’, बिहारमध्ये हिंदू संघटनांचा इशारा, ‘जय श्री राम’ची नारेबाजी

नुपुर शर्मा यांच्या विरोधात मुस्लिम संघटना देशातील विविध भागात रस्त्यावर उतरल्या. अनेक भागात हिंसक आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर आता हिंदू संघटना नुपुर शर्मा यांच्या बाजूने रस्त्यावर उतरत असल्याचं पहायला मिळत आहे.

Nupur Sharma : 'नुपुर शर्मांच्या केसालाही धक्का लागला तर तुम्ही 100 कोटी लोकांना झेलू शकणार नाहीत', बिहारमध्ये हिंदू संघटनांचा इशारा, 'जय श्री राम'ची नारेबाजी
नुपुर शर्माच्या समर्थनात हिंदू संघटनांचा मोर्चाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 15, 2022 | 4:50 PM

नवी दिल्ली : मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर भाजपच्या प्रवक्ता नुपुर शर्मा (Nupur Sharma) यांच्या विरोधात देशभरात मुस्लिम संघटना आक्रमक झाल्या. इतकंच नाही तर अरब राष्ट्रातूनही (Arab nations) निषेधाचे सूर उमटले. त्यानंतर भाजपनं शर्मा यांच्यावर कारवाई करत त्यांची पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी केली. मात्र, आता नुपुर शर्मा यांच्या समर्थनात हिंदू संघटना रस्त्यावर उतरत असल्याचं पाहायला मिळत आहे. बिहारच्या (Bihar) आरा आणि हाजीपूरमध्ये नुपुर शर्मा यांच्या समर्थनात आंदोलन करण्यात आलं. अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले होते. नुपुर शर्मा यांच्या विरोधात मुस्लिम संघटना देशातील विविध भागात रस्त्यावर उतरल्या. अनेक भागात हिंसक आंदोलन करण्यात आलं. त्यानंतर आता हिंदू संघटना नुपुर शर्मा यांच्या बाजूने रस्त्यावर उतरत असल्याचं पहायला मिळत आहे.

हाजीपूरमध्ये मंगळवारी हिंदू पुत्र संघटनेकडून आयोजित आरतीनंतर मशिदीबाहेर संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं. ‘नुपुर शर्मा तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ है’, अशा घोषणा दिल्या. सोबतच ‘पाकिस्तान परस्त मुर्दाबाद’, ‘इस्लामिक जिहाद मुर्दाबाद’ अशी घोषणाबाजीही करण्यात आली. मशिदीबाहेर हिंदू संघटना आंदोलन करत असल्याची माहिती मिळताच प्रशासनाचे धाबे दणाणले. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक स्वत: घटनास्थळी दाखल झाले.

हे सुद्धा वाचा

‘..तर तुम्ही 100 कोटी लोकांना झेलू शकणार नाहीत’

आंदोलकांना पांगवण्यासाठी आणि शांतता प्रस्थापित करण्यासाठी मशिद परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. दरम्यान, हिंदू पुत्र संघटनेनं कुठलाही राडा न करता आरती केली, प्रसाद वाटला आणि नुपुर शर्मा यांच्या समर्थनात जोरदार घोषणाबाजी केली. बिहारच्या आरामध्येही नुपुर शर्मा यांच्या समर्थनात सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि अभाविप यांनी संयुक्तरित्या ही सभा आयोजित केली होती. या सभेनंतर रॅलीही काढण्यात आली. आमची शांतता म्हणजे आमची कमजोरी नाही, असा इशाराच या सभेद्वारे देण्यात आला. सभेवेळी जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्या. नुपुर शर्मा यांच्या केसालाही धक्का लागू शकत नाही. नुपुर शर्मा यांना काही झालं तर तुम्ही 100 कोटी लोकांना झेलू शकणार नाहीत, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

नुपुर शर्माच्या समर्थनात मोठी रॅली

इतकंच नाही तर ‘तुम्ही हिंदुंना छेडाल तर तुम्हाला कुणी वाचवू शकणार नाही’, असाही इशारा देण्यात आला. सभेवेळी हातात टॉर्च आणि भगवा झेंडा घेऊन हिंदू संघटनाचे लोक रात्रभर फिरताना दिसून आले. आरामध्ये नुपुर शर्मा यांच्या समर्थनात काढण्यात आलेल्या रॅलीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली
पुलवामा हल्ल्यात पाकिस्तानचा हात, स्वत: दिली कबुली.
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना
गोळ्या आल्या तर गोळे फेका; मोदींच्या सैन्यदलाच्या प्रमुखांना सूचना.
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग
भारतीय सेनेची धमक रावळपिंडीपर्यंत गेली - संरक्षणमंत्री राजनाथ सिंग.
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!
पाकिस्तानच्या ख्वाजा आसिफला भारताकडून सकारात्मक चर्चेच्या अपेक्षा!.
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ
ब्रह्मोसची ताकद काय आहे ते पाकिस्तानला विचारा - योगी आदित्यनाथ.
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती
जैसलमेरच्या भटोडा गावात जीवंत स्फोटकं सापडले, नागरिकांमध्ये भिती.
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?
भारत - पाकिस्तानच्या डिजीएमओची बैठक, काय होणार चर्चा?.
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार
शेतकऱ्यांना दिलासा मिळणार! भारतात वेळेच्या आधीच पाऊस दाखल होणार.
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर
जम्मू काश्मीर, जैसलमेर, अमृतसरमध्ये परिस्थिती पूर्वपदावर.
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम
अटारी बॉर्डरवर तणावपूर्ण शांतता; अमृतसरमध्ये रेड अलर्ट कायम.