NDRF च्या जवानाने दिला होता Odisha Train Accident पहिला अलर्ट, पुढे काय झालं?
Odisha Train Accident: बालासोर जिल्ह्यातील बहानागा बाजार स्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी हा अपघात झाला. या भीषण अपघातात 280 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, NDRF चा एक जवान चर्चेत आहे. जवान सुट्टीवर होता आणि त्याच ट्रेनमधून प्रवास करत होता. व्यंकटेश एनके एक महिन्याच्या रजेवर होते.
बालासोर: ओडिशातील बालासोर येथे झालेल्या रेल्वे अपघाताने संपूर्ण हादरला. बालासोर जिल्ह्यातील बहानागा बाजार स्थानकाजवळ शुक्रवारी सायंकाळी हा अपघात झाला. या भीषण अपघातात 280 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, NDRF चा एक जवान चर्चेत आहे. जवान सुट्टीवर होता आणि त्याच ट्रेनमधून प्रवास करत होता. व्यंकटेश एनके एक महिन्याच्या रजेवर होते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एनडीआरएफचे जवान व्यंकटेश एनके शुक्रवारी हावडा हून कोरोमंडल एक्स्प्रेसने तामिळनाडूतील नायक पट्टी तेजावर जिल्ह्यातील आपल्या घरी जात होते. ते बोगी B 7 च्या सीट क्रमांक 68 वर असताना सायंकाळी 6.30 वाजता त्यांना जोरदार धक्का बसला.जेव्हा त्याने आपल्या कंपार्टमेंटचा दरवाजा उघडला तेव्हा त्याला धक्काच बसला. अपघात झाला होता. बोग्या उलटल्या होत्या.
यानंतर त्याने सर्वप्रथम त्याने इन्स्पेक्टरला फोन केला. इन्स्पेक्टरने आपल्या कमांडरला अपघाताची माहिती दिली आणि तात्काळ मुख्यालयाला माहिती दिली. त्यामुळे बचावकार्यात सहभागी होण्यापूर्वी आपत्कालीन सेवेला रेल्वे अपघाताची माहिती देणारे ते बहुधा पहिलेच व्यक्ती होते. B-7 हा डबा रुळावरून घसरला होता समोरच्या डब्याला धडकला नव्हता अशी माहिती रेल्वे अधिकाऱ्यांनी दिली.
आणखी एका मीडिया रिपोर्टनुसार, व्यंकटेश म्हणाला, “मला धक्का बसला. मग मला काही प्रवासी माझ्या डब्यात पडलेले दिसले. मी आधी त्या प्रवाशांना बाहेर काढलं आणि रेल्वे रुळाजवळच्या एका दुकानात बसवलं. मग मी इतरांच्या मदतीला धावलो. त्यानंतर माहिती मिळताच मदत आणि बचाव पथके येण्यास सुरुवात झाली. स्थानिकांनी खूप मेहनत घेतली आणि त्यांनी जखमींना बाहेर काढले, असेही ते म्हणाले.”
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की, ओडिशा रेल्वे अपघाताचे कारण शोधण्यात आले आहे. त्याची चौकशी पूर्ण झाली आहे. त्याचा अहवाल लवकरच सादर केला जाणार आहे. पंतप्रधानांनी दिलेल्या सूचनांचे काम वेगाने सुरू असल्याचेही अश्विनी वैष्णव यांनी सांगितले आहे.