अवघ्या 24 तासांत मिळवले 81 सर्टिफिकेट, ठरला वर्ल्ड रेकॉर्ड
कोट्टायन जिल्ह्यात इल्लीकल येथील रहिवासी असलेली रेहना ही तिची बहीण नेहला हिच्यापासून प्रेरित आहे. नेहला तिच्या बहिणीला प्रेमाने इथा अशी हाक मारते. दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेमध्ये ऑपरेशन रिसर्चमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेली नेहला सध्या लंडनमध्ये नोकरी करते. रेहनाचे म्हणणे आहे की नेहला ही अभ्यासात कायमच हुशार राहिलेली आहे. तिच्यापासून प्रेरणा घेऊन रेहनानेही स्वताला हुशार घडवण्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले आहेत.
तिरुअनंतपूरम- अवघ्या 24 तासांत 81 सर्टिफिकेट मिळवणाऱ्या केरळच्या (Kerala girl) या मुलीने संपूर्ण जगात भारताच्या नावाचा डंका पिटला आहे. केरळच्या रेहना शाहजहाने (Rehna)जगासमोर असे काही करुन दाखवले आहे की, ते पाहून सगण्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. गणिताच्या हिशोबात 24 तासांत 81 सर्टिफिकेट (world record )ण्याचा अर्थ असा आहे की, तिने एका तासात तिने तीन पेक्षा जास्त सर्टिफिकट मिळवले आहे. म्हणजे वीस मिनिटांत एक सर्टिफिकेट तिने मिळवले आहे.
पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर रेहना मॅनेजमेंटचा अभ्यास करु इच्छित होती. त्यासाठी तिने कॉमन इंन्टरन्स टेस्ट (कॅट)ची तयारी केल्यानंतर रेहनाने कॅट परीक्षाही पास केली. रेहना तिच्या बॅचची एकमेव मल्याळी विद्यार्थिनी आहे. तिने जामिया मिलिया इस्लामियामध्ये एमबीए प्रोगाममध्ये प्रवेश घेतला. अभ्यासात रेहनाची गती आणि उत्साह इतका आहे की तिने एकाच दिवसात सर्वाधिक ऑनलाईन सर्टिफिकेट घेण्याचा विश्वविक्रमच स्वताच्या नावे केला आहे. रेहानाला 24 तासांत 81 सर्टिफिकेट मिळाले आहेत.
बहिणीपासून मिळाली प्रेरणा
कोट्टायन जिल्ह्यात इल्लीकल येथील रहिवासी असलेली रेहना ही तिची बहीण नेहला हिच्यापासून प्रेरित आहे. नेहला तिच्या बहिणीला प्रेमाने इथा अशी हाक मारते. दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेमध्ये ऑपरेशन रिसर्चमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलेली नेहला सध्या लंडनमध्ये नोकरी करते. रेहनाचे म्हणणे आहे की नेहला ही अभ्यासात कायमच हुशार राहिलेली आहे. तिच्यापासून प्रेरणा घेऊन रेहनानेही स्वताला हुशार घडवण्यासाठी जिद्दीने प्रयत्न केले आहेत.
महिलांसाठी एनजीओसोबतही केले काम
रेहनाने सांगितले की तिच्या बहिणीला जेव्हा लेडी श्रीराम कॉलेजमध्ये एडमिशन मिळाली त्यावेळी तीलाही स्वताही सेंट्रल युनिव्हर्सिटीत प्रवेश घेऊन नशीब आजमावण्याची इच्छा निर्माण झाली. मात्र छोट्या फरकाने तिची ही संधी गेली. मात्र त्यानंतचर दोन पीजी डिग्री मिळवण्याबरबोरच तिने दिल्लीतील एका एनजीओ महिला घोषणापत्र यासाठीही काम केले आहे. ही संस्था महिला सशक्तीकरणासाठी काम करते.
स्वप्न पाहण्यापेक्षा मेहनत करा
कॅटची परीक्षा पास झाल्यानंतर, चांगले मार्क आपणही मिळवू शकतो असा विश्वास रेहनाला आला. केवळ स्वप्न पाहण्यापेक्षा त्यासाठी मेहनत करण्याची गरज असल्याचे तिचे म्हणणे आहे. अनेक सर्टिफिकेट कोर्स करुन ती स्वताची गुणवत्ता अधिक वाढवण्याचा प्रयत्न करीत आहे. एका दिवसात सर्वाधिक सर्टिफिकेट घेण्याचा विश्वविक्रम हा यापूर्वी 75 चा होता.
कुटुंबाला सर्वोच्च प्राधान्य
विश्वविक्रम करणाऱ्या रेहनाने नुकतीच दुबईत मॅनेजमेंट प्रोफेशनल म्हणून असलेली तिची नोकरी सोडली आहे. तिचे वडील शाहजहा यांची काळजी घेण्यासाठी तिने हा मोठा निर्णय घेतलाय. रेहनाच्या वडिलांची ट्रान्सप्लान्ट सर्जरी झाली होती. रेहनाच्या कुटुंबात तिचे वडील, आई सीएम रफीथ आणि पती इब्राहिम रियाज हे आहेत. तिचे पती हे आयटी इंजिनिअर आहेत. तिचे कुटुंब आणि तिची बहीण ही तिच्यासाठी सर्वोच्च स्थानी असल्याचे रेहनाने सांगितले आहे. कुटुंब हाच आपला सर्वाधिक पाठिंबा असल्याचे रेहना सांगते.