प्रत्येक महिन्याला 2500 रुपये, मोफत शिक्षणासोबत निशुल्क उपचार, अनाथ मुलांना सरकार चा ‘आशीर्वाद’
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या लाटेत मृतांचे प्रमाण अधिक आहे. या लाटेत काही बालकांचे आई-वडील मारण पावले. याच पार्श्वभूमीवर ओडिशा सरकारने अनाथ मुलांसाठी 'आशीर्वाद' योजना नव्याने लागू केली आहे.
भुवनेश्वर : कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे. दुसऱ्या लाटेत मृतांचे प्रमाण अधिक आहे. या लाटेत काही बालकांचे आई-वडील मारण पावले. तर काही कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे कोरोनामुळे निधन झाले. याच कारणामुळे कोरोना महामारीमुळे ज्या बालकांचे पालक मरण पावले आहेत, त्यांच्या भविष्याची काळजी घेण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. तसेच ओडिशा सरकारनेसुद्धा अनाथ मुलांसाठी ‘आशीर्वाद’ योजना नव्याने लागू केली आहे. (Odisha government will provide free education mediclaim under Ashirwad scheme for orphan)
ओडिशा राज्यात 2020 पासून लागू असलेल्या आशीर्वाद योजनेत लाभार्त्याचे तीन श्रेणींमध्ये गट पाडलेले आहेत.
पहिला गट : जी मुलं अनाथ आहेत.
दुसरा गट : ज्या मुलांना बालगृहात जावं लागलेलं आहे.
तिसरा गट : अशी मुलं ज्यांच्या आई-वडिलांपैकी कमावत्या व्यक्तीचे निधन झाले आहे.
प्रत्येक महिन्याला 2500 रुपये
या योजनेंतर्गत ज्या मुलांचे आई-वडील किंवा दोघांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. अशा मुलांना सरकार प्रतिमहिना 2,500 रुपये देणार आहे. या मुलांना जे लोक सांभाळतात, त्यांच्या खात्यात ही रक्कम ट्रान्सफर केली जाईल. यामध्ये जी मुलं बालगृहात आहेत त्यांना अतिकिरक्त 1000 रुपये दिले जातील. अनाथ मुलं 18 वर्षांची होईपर्यंत हे पैसे दिले जातील.
मुलाच्या आई-वडिलांपैकी कमावणाऱ्या एकाचा मृत्यू झाला तर मुलाला 1,500 रुपये दिले जातील. अनाथ मुलांची आई जर ओडिशा सरकारने सुरु केलेल्या मधु बाबू पेंशन योजनेस पात्र असेल तर त्या आईचा या योजनेसाठी प्राधान्याने विचार केला जाणार आहे.
मोफत शिक्षण, उपचार तसेच जेवण
जी बालकं अनाथ झाली आहेत किंवा बालगृहात राहातात त्यांच्या आरोग्याची जबाबदारी ओडिशा सरकार घेणार आहे. केंद्र सरकारप्रमाणेच ओडिशा सरकारसुद्धा आरोग्य कल्याण योजनेंतर्गत अशा बालकांना निशुल्क आरोग्य सेवेची सुविधा पुरवणार आहे. विशेष म्हणजे ओडिशा सरकाकडून या विद्यार्थ्यांच्या शाळेचा खर्चही उचलला जाणार आहे.
मुलांची काळजी घेणाऱ्यांना पक्के घर
अनाथ मुलांची ज्या व्यक्ती देखभाल करतील. त्या सर्वांना पक्के घर बांधून देण्याचेही ओडिशा सरकारने घोषित केले आहे. असे असले तरी ज्या बालकांना कोणीतरी दत्तक घेतले आहे त्यांना ‘आशीर्वाद’ योजना लागू होणार नाही, असेही सरकारने सांगितले आहे.
सर्व लाभार्थ्यांना योजनेचा फायदा मिळावा
या योजनेचा शुभारंभ केल्यांतर ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या योजनेंतर्गत बाल संरक्षण विभाग, मंडळ आणि पंचायत स्तरावरील समिती, चाईल्डलाईन, फ्रन्ट वर्कर म्हणून काम करणारे कर्मचारी यांना एकही लाभार्थी या योजनेपासून वंचित राहाता कामा नये, असे निर्देश दिले आहेत.
दरम्यान, कोरोनाच्या लाटेमध्ये ज्या बालकांच्या पालकांचा मृत्यू झाला आहे, त्यांची काळजी घेण्याचे केंद्र सरकारने यापूर्वीच ठरवलेले आहे. केंद्र सरकारने अशा बालकांचे शिक्षण, आरोग्य विमा, मासिक भत्ता तसेच हे बालक मोठे झाल्यानंतर त्यांना 10 लाख मदत देण्याचे घोषित केलेले आहे. ही सर्व मदत पीएम केअर्स फंडमधून केली जाणार आहे.
इतर बातम्या :
Yoga Day 2021: आंतरराष्ट्रीय योगा दिवस; पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पहाटे देशाला संबोधित करणार
कोरोनाने दगावणाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 4 लाख रुपये भरपाई देणे अशक्य: केंद्र सरकार
(Odisha government will provide free education mediclaim under Ashirwad scheme for orphan)