साप चावल्याने खवळला, पठ्ठ्याने सापालाच चावलं, तडफडून सापाचा मृत्यू
जाजपूरमध्ये एका व्यक्तीला साप चावला. त्याने त्याचक्षणी सापाचा बदला घेतला. माणसाच्या चाव्याने साप देखील मरण पावला. एका 45 वर्षीय व्यक्तीला सापाने दंश केला, प्रत्त्युत्तरादाखल संबंधित व्यक्तीने सापावर हल्ला चढवला. हल्ल्यात सापाचा तडफडून मृत्यू झालाय.
भुवनेश्वर : ओडिशाच्या जाजपूर जिल्ह्यातून एक विचित्र प्रकरण समोर आलं. जाजपूरमध्ये एका व्यक्तीला साप चावला. त्याने त्याचक्षणी सापाचा बदला घेतला. माणसाच्या चाव्याने साप देखील मरण पावला. एका 45 वर्षीय व्यक्तीला सापाने दंश केला, प्रत्त्युत्तरादाखल संबंधित व्यक्तीने सापावर हल्ला चढवला. हल्ल्यात सापाचा तडफडून मृत्यू झालाय. या आगळ्यावेगळ्या घटनेची देशभरात चर्चा होत आहे.
साप चावल्याने खवळला, पठ्ठ्या सापालाच चावला
जाजपूर जिल्ह्यातील दानागडी भागात, किशोर बद्रा नावाच्या व्यक्तीला बुधवारी रात्री शेतातून परतताना सापाने दंश केला. किशोरने त्याच क्षणी त्या सापाला पकडलं, त्याच्यावर हल्ला चढविला आणि सापाला जखमी केलं, पण किशोरच्या हल्ल्यात सापाला आपले प्राण वाचवता आले नाही.
मरत नाही तोपर्यंत सापाला चावत राहिला
या घटनेविषयी किशोरने सांगितलं, ‘जेव्हा मी रात्री शेतातून घरी येत होतो, तेव्हा काहीतरी माझ्या पायाला टोचतंय असं मला जाणवलं. मी टॉर्च लावून पाहिलं असता, साप माझ्या पायावर होता. मी त्याचक्षणी सापाला घट्ट पकडलं.. आणि त्याला सतत चावत राहिलो, तो जागच्या जागी मरुन पडलो.
वाऱ्यासारखी बातमी गावात पसरली!
किशोरने तो मृत साप आपल्या घरी आणला आणि आपण केलेला पराक्रम पत्नीसमोर कथन केला. काहीच वेळात ही घटना वाऱ्यासारखी गावात पसरली. किशोरने केलेल्या कृत्याची संपूर्ण पंचक्रोशीत एकच चर्चा होती.
(Odisha Jajpur Man Attack Snake kill on Spot)
हे ही वाचा :
Video | एकाच वेळी दोन उंदीर गिळण्याचा प्रयत्न, दुतोंडी सापाचा दुर्मिळ व्हिडीओ एकदा पाहाच !