ओडिसा रेल्वे अपघात प्रकरणी CBI ची मोठी कारवाई, इंजिनिअरचे घर सील करताच परिवारासह बेपत्ता

Odisha Train Accident : ओडिशामधील भीषण रेल्वे अपघाताचा सीबीआयने तपास सुरु केला आहे. या प्रकरणी एका अभियत्याची चौकशी केली. या चौकशीनंतर तो परिवारासह बेपत्ता झाला आहे. यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

ओडिसा रेल्वे अपघात प्रकरणी CBI ची मोठी कारवाई, इंजिनिअरचे घर सील करताच परिवारासह बेपत्ता
Odisha train accident Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 20, 2023 | 2:45 PM

भुवनेश्वर : ओडिशातील बालासोर येथील रेल्वे अपघात प्रकरणी सीबीआयचा तपास सुरु आहे. २ जून रोजी झालेल्या या अपघातात 278 जणांचा मृत्यू झाला होता तर 1100 लोक जखमी झाले होते. या तिहेरी रेल्वे अपघाताचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) सुरू केला आहे. सीबीआयचे १० सदस्यीय पथकाने हा तपास सुरु केला आहे. या प्रकरणी सीबीआयने कनिष्ठ अभियंत्याची अज्ञातस्थळी चौकशी केली होती. त्यानंतर त्याचे घरही सील केले. परंतु त्यानंतर त्याचा परिवार बेपत्ता झाला आहे. यामुळे या प्रकरणाचे गूढ वाढले आहे.

काय केली कारवाई

ओडिशात बालासोर येथे २ जून रोजी रेल्वेचा तिहेरी अपघात झाला होता. या अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्यात आला. त्यानंतर सीबीआयने सोरो सेक्शनचे सिग्नल विभागातील कनिष्ठ अभियंता अमीर खान याची अज्ञात स्थळी चौकशी केली. त्यानंतर त्याचे घर सील केले. या घरात तो भाड्याने राहत होता. सीबीआयने चौकशी करताच तो कनिष्ठ अभियंतासह बेपत्ता झाला आहे.

प्राथमिक तपासात दावा

प्राथमिक तपासानंतर ओडिशामधील अपघातामागे सिग्नल प्रणालीत केलेला बदल हे अपघाताचे कारण असल्याचे मानले जात आहे. यामुळे रेल्वेने स्टेशन रिले रूम आणि कंपाऊंड हाउसिंग सिग्नलिंग उपकरणांच्या सुरक्षेसाठी सर्व विभागीय मुख्यालयांना अनेक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. तसेच एक सुरक्षा मोहीम देखील सुरू केली आहे, ज्यामध्ये दुहेरी लॉकिंग व्यवस्थेचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

कसा झाला अपघात

कोरोमंडल एक्सप्रेस ही चेन्नईहून पश्चिम बंगलाच्या हावडाकडे जात होती. ओडिशामधील बालासोरपासून 40 किमी अंतरावर ही एक्सप्रेस मालगाडीला धडकली आहे. या भीषण अपघातात कोरोमंडल एक्सप्रेसचे 18 डब्बे रुळावरुन घसरले आहेत. तर चार ते पाच डब्बे आडवे पडले आहेत. घटनास्थळी हाहाकार उडाला आहे

बहनागा स्टेशनजवळ शुक्रवारी कोरोमंडल एक्स्प्रेस आणि मालगाडीची एकमेकांना धडक बसली. यानंतर कोरोमंडल एक्स्प्रेसचे डब्बे यशवंतपूर हावडा एक्स्प्रेस ज्या रेल्वे रुळावरुन जात होती, त्या ठिकाणी पडले. यामुळे या गाडीचा अपघात झाला. या तिहेरी अपघातात अनेक डब्बे मालगाडीवर चढले. सात डब्बे पलटी झाले. चार डब्बे रेल्वे बाँड्रीच्या बाहेर गेले. एकूण 15 डब्बे पटरीच्या बाहेर होते.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.