बालासोर (ओडिशा) : चेन्नईहून ओडिशा मार्गाने पश्चिम बंगालच्या हावडा रेल्वे स्थानकाच्या दिशेला निघालेल्या कोरोमंडल एक्स्प्रेसचा भीषण रेल्वे अपघात घडल्याची माहिती मिळत आहे. या घटनेमुळे मोठा हाहाकार उडाला आहे. या अपघातात आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. तर 132 पेक्षा जास्त जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. संपूर्ण देशाला हादरवणारी ही घटना आहे. ‘टीव्ही 9 भारतवर्ष’ने दिलेल्या आकडेवारीनुसार, आतापर्यंत 30 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ‘एबीपी न्यूज’ने दिलेल्या माहितीनुसार, मृतांचा आकडा हा 50 वर पोहोचला आहे. तर जखमींचा आकडा हा 200 पेक्षा जास्त सांगितला जातोय. संपूर्ण देशाला धक्का देणारी ही घटना आहे.
ओडिशामध्ये खूप मोठा रेल्वे अपघात घडला आहे. ओडिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्स्प्रेसची मालगाडीला धडक बसल्याने मोठा हाहाकार उडाला आहे. या अपघातात रेल्वे गाडीचे अनेक डब्बे पलटी झाले आहेत. मोठी जीवितहानी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेकजण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. कोरोमंडल एक्सप्रेस ही सुपरफास्ट ट्रेन आहे. अपघात खूप मोठा आहे. कोरोमंडल एक्सप्रेसचे चार ते पाच डब्बे पलटी झाले आहेत. तर 18 डब्बे रुळावरुन घसरले आहेत.
कोरोमंडल एक्सप्रेस ही चेन्नईहून पश्चिम बंगलाच्या हावडाकडे जात होती. ओडिशामधील बालासोरपासून 40 किमी अंतरावर ही एक्सप्रेस मालगाडीला धडकली आहे. या भीषण अपघातात कोरोमंडल एक्सप्रेसचे 18 डब्बे रुळावरुन घसरले आहेत. तर चार ते पाच डब्बे आडवे पडले आहेत. घटनास्थळी हाहाकार उडाला आहे. प्रचंड आक्रोशाचा आवाज येतोय.
घटनेची माहिती मिळताच परिसरातील स्थानिक नागरीक घटनास्थळी पोहोचले आहेत. रेल्वे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली. तसेच सिटी पोलीसही तिथे दाखल झाले. घटनास्थळी मोठी रेस्क्यू टीम दाखल झाली. रुग्णवाहिका, डॉक्टर दाखल झाले. घटना खूप मोठी आहे. अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनास्थळापासून जवळ असलेल्या सर्व रुग्णालयांमध्ये मोठी गर्दी निर्माण झाली आहे. जखमींना तातडीने तिथे उपचारासाठी दाखल केलं जात आहे.
#WATCH रेलवे द्वारा रेस्क्यू ऑपरेशन किया जा रहा है। घटनास्थल पर ऐंबुलेंस पहुंच चुकी हैं। सहायता नंबर भी जारी किए गए हैं। रेलवे की टीम घायलों को बचाने का और अस्पताल पहुंचाने का पूरा प्रयास कर रही है: कोरोमंडल एक्सप्रेस रेल दुर्घटना पर अमिताभ शर्मा, कार्यकारी निदेशक, सूचना प्रकाशन… pic.twitter.com/WX9lzy6Jk9
— ANI_HindiNews (@AHindinews) June 2, 2023
रेल्वे विभागाचे ज्येष्ठ अधिकारी अमिताभ शर्मा यांनी या अपघातावर महत्त्वाची माहिती दिली आहे. रेल्वे प्रशासनाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे. घटनास्थळी रुग्णवाहिका पोहोचल्या आहेत. मदतीसाठी आपात्कालीन फोन नंबरही जारी करण्यात आले आहेत. बचाव पथक युद्ध पातळीवर काम करत आहे, अशी माहिती त्यांनी दिली आहे.