Odisha Train Accident: माणुसकीची रांग! भीषण रेल्वे अपघातानंतर लोकांच्या लांबच लांब रांगा
Train Accident: रक्तदान करणाऱ्या लोकांव्यतिरिक्त सुमारे 200 रुग्णवाहिकांसह 45 फिरती आरोग्य पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू आहे. मदतीसाठी लोकांची गर्दी होत आहे.
बालासोर: ओडिशातील बालासोर जिल्ह्यात तीन रेल्वेगाड्यांमध्ये झालेल्या रेल्वे अपघातात 280 जणांचा मृत्यू झाला असून 900 हून अधिक जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात बचावकार्य सुरू आहे. दरम्यान, माणुसकीचे उदाहरण देणारे काही खास फोटो समोर आले आहेत, ज्यात जखमींना रक्तदान करण्यासाठी लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. याशिवाय स्थानिक लोकही मदत आणि बचाव कार्यात टीमसह मदत करत आहेत.
वास्तविक आरोग्य विभागाने रक्तदानासाठी शिबिराचे आयोजन केले असून तिथे लोक रक्तदान करत आहेत. या बचावकार्यात स्थानिक लोकांची मोलाची मदत होत आहे. जखमींना रुग्णालयात नेण्यासह अनेक कामांमध्ये ते सहकार्य करत आहेत. जखमींच्या उपचारासाठी रक्ताची मागणी अचानक वाढली आणि सर्व युनिट रक्ताची गरज भासू लागली. या पार्श्वभूमीवर लोकांनी माणुसकीचे उदाहरण सादर केले आहे. रक्तदान करण्यासाठी लोक स्वत:हून रुग्णालयात पोहोचत आहेत.
Thank you to all local people who donet blood for injured people in #TrainAccident …. God bless all people ? pic.twitter.com/Ak5VQqAqzr
— Gautam Kumar ?? (@GautamKumar_2) June 3, 2023
काही छायाचित्रे समोर आली आहेत ज्यात परिस्थिती अशी दिसत आहे की रुग्णालयांमध्ये रक्तदात्यांच्या रांगा लागल्या आहेत. बालासोरमध्ये एका रात्रीत 500 युनिट रक्त गोळा करण्यात आल्याचे सांगण्यात आले. एका मीडिया रिपोर्टनुसार, तरुणाईची गर्दी दिसतेय आणि लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतायत. कोणी 2 तास उभे राहिले, तर कोणी 4 तास उभे राहिले. वैद्यकीय महाविद्यालयात रक्तदान करण्यासाठी आलेले हे तरुण आहेत.
Local ppl queuing up in Balasore since night to donate blood for Train accident victims.
A big salute to them ?
— Rishi Bagree (@rishibagree) June 3, 2023
कोलकात्यापासून 250 किमी दक्षिणेला आणि भुवनेश्वरपासून 170 किमी उत्तरेला बालासोर जिल्ह्यातील बहानागा बाजार स्थानकाजवळ शुक्रवारी संध्याकाळी हा अपघात झाला. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी या घटनेनंतर एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. दरम्यान, या दुर्घटनेतील जखमींना रेल्वेने नुकसान भरपाई जाहीर केली आहे. मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपये आणि जखमींना 2 लाख रुपयांची मदत देण्यात येणार आहे. किरकोळ जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपये देण्यात येणार आहेत.