Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Odisha Train Accident : टॉयलेटमध्ये होती म्हणून वाचली, त्याने डोळे उघडताच प्रेतांच्या राशी पाहून हादरला; अपघातातून वाचलेल्यांनी काय पाहिलं?

ओडिशाच्या बालासोर येथील अपघातात 280 प्रवासी ठार झाले आहेत. तर 900 प्रवासी जखमी झाले आहेत. तीन ट्रकची एकमेकांना धडक बसल्याने हा अपघात झाला. अपघात अत्यंत भीषण आणि विचित्र होता.

Odisha Train Accident : टॉयलेटमध्ये होती म्हणून वाचली, त्याने डोळे उघडताच प्रेतांच्या राशी पाहून हादरला; अपघातातून वाचलेल्यांनी काय पाहिलं?
Odisha train accident Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 1:42 PM

बालासोर : शुक्रवारचा दिवस. संध्याकाळचे 6.30 ते 7 चा सुमार. ट्रेन आपल्या वेगात चालली होती. ज्येष्ठ नागरिक एकमेकांशी मनसोक्त गप्पा मारत होते. लहान मुलांचीही चुळबुळ सुरू होती. कोणी रात्रीच्या जेवणाची ऑर्डर देत होते. कोणी मोबाईलमध्ये खेळत होतं. कोणी मोबाईलवरून गप्पा मारत होतं. कोणी पेपर वाचत होतं तर कोणी पुस्तक. यातील कुणालाही माहीत नव्हतं हा आपला शेवटचा प्रवास आहे. कोरोमंडल एक्सप्रेसमधून सर्व प्रवास करत होते. अचानक ही ट्रेन मालगाडीला धडकली. त्यामुळे मालगाडी दुसऱ्या ट्रेनला धडकली. तीन ट्रेनची धडक झाली अन् या अपघातात 280 लोकांचा मृत्यू झाला. 900 लोक जखमी झाले. हा अपघात कसा झाला याची माहितीच प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

या ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या एका 19 वर्षीय तरुणाने अपघाताची हकीकत सांगितली. अपघात कसा झाला? असा सवाल त्याला करताच त्याचा घसा कोरडा पडला. क्षणभर त्याचे डोळे बंद झाले. जणू काही त्या दुर्घटनेचं चलचित्रच त्याच्या डोळ्यासमोर आलं. शेकडो लोक दगावली. 19 वर्षाचा निवास कुमार या अपघातातून आश्चर्यकारकरित्या बचावला. तो आजोबासोबत हावडाहून बिहारला जात होता. अपघाताचा विषय छेडताच तो दचकला. त्याच्या डोळ्यातून भीती स्पष्ट दिसत होती.

हे सुद्धा वाचा

तोपर्यंत सर्व ठिक होतं

अपघाताच्या काही वेळ आधी सर्व काही ठिक होतं. मुलं खेळत होती. लोक गप्पा मारत होते. तर कोणी निर्धास्तपणे झोपलेलं होतं. अचानक वादळ आलं. जोरदार आवाज झाला. कान सुन्न झाले. डोळे बंद झाले. थोड्यावेळाने डोळे उघडले तर समोरचं दृश्य पाहून हादरून गेलो. चारही बाजूंनी प्रेतांच्या राशी होत्या. मुलांच्या किलबिलाटा ऐवजी रडारड ऐकू येत होती. कुठे ज्येष्ठांचा चष्मा पडलेला होता, कुठे मुलांचे कपडे तर कुठे खेळणी अस्तव्यस्त पडलेल्या होत्या. रुग्णवाहिकेच्या सायरन आणि लोकांच्या किंचाळण्याचे आवाजच ऐकू येत होते, असं निवास म्हणाला. जेव्हा अपघात झाला तेव्हा तो बेशुद्ध पडला. त्याला बाहेर काढल्यानंतर रुग्णालयात दाखल केलं. या दुर्घटनेतून तो बचावला असला तरी सावरलेला नाहीये.

वॉशरूममध्ये होती म्हणून

या अपघातातून बचावलेल्या एका महिलेनेही तिची आपबीती ऐकवली आहे. अपघात झाला तेव्हा ही महिला कोरोमंडल एक्सप्रेसमध्येच होती. वंदना तिचं नाव. अपघात झाला तेव्हा ती वॉशरुमला गेली होती. त्यामुळे ती बचावली. वॉशरुममधून बाहेर आल्यावर ही महिला पूर्णपणे हादरून गेली. कारण ट्रेन कलंडली होती. प्रवाशांचं सामान अस्तव्यस्त पडलेलं होतं. लोक एकमेकांवर पडलेले होते. काय झालं हे समजण्याला मार्ग नव्हता. चारही बाजूने प्रेतांचा खच होता. मात्र, केवळ वॉशरुममध्ये होती म्हणून ही महिला बचावली. अपघातानंतर या महिलेला सुखरूप बाहेर काढण्यात आलं.

संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब
'हो, मीच हत्या केली..'; सुदर्शन घुलेचा कबुली जबाब.
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड
पाणीबाणीला सुरुवात; 2 हंड्यापेक्षा जास्त पाणी घेतलं तर 100 रुपये दंड.
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा
'कुणाल कामराला थर्ड डिग्रीचा वापर', शिवसेनेच्या बड्या मंत्र्याचा इशारा.
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?
मी नार्को टेस्टसाठी तयार, पण.. ; सतीश सालियान नेमकं काय म्हणाले?.
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत
'तो' बलात्कार नाही, अलाहाबाद कोर्टाला फटकारल, 'राज्य महिला'कडून स्वागत.
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप
धनंजय मुंडे यांनीच हे सगळं करायला सांगितलं; जरांगेंचा गंभीर आरोप.
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स
बाळासाहेबांच्या 'त्या' सूचना तरी मनसेकडून गुढीपाडवा मेळाव्याचे बॅनर्स.
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्..
महामार्गावर दारूच्या बॉटल्सने भरलेला ट्रक, मिटकरींनी पाठलाग केला अन्...
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला
सरकारला कोण जगतं, कोण मरतं याच्याशी देणघेण नाही; अंबादास दानवेंचा टोला.