मोहब्बत ज़िंदाबाद… कपाळाला कुंकू लावलं, उचकी आली अन्… नेमकं काय घडलं?

झारखंडच्या एका गावात एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. ज्या दिवशी पत्नीने जीव सोडला. त्याच दिवशी अवघ्या काही तासात पतीनेही जगाचा निरोप घेतल्याची घटना घडली आहे. दोघेही बुजुर्ग होते. पण त्यांच्यात प्रेमाचं अतूट नातं होतं. त्यांच्या मृत्यूनंतर बँडबाजा वाजवून त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांच्या अंत्ययात्रेला अख्खा गाव लोटला होता.

मोहब्बत ज़िंदाबाद... कपाळाला कुंकू लावलं, उचकी आली अन्... नेमकं काय घडलं?
old man diesImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 15, 2023 | 9:49 PM

रांची | 15 डिसेंबर 2023 : झारखंडच्या रामगड येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे अख्खा गाव हादरून गेला आहे. या घटनेच्या निमित्ताने बुजुर्ग दाम्पत्याच्या अतुट प्रेमाची चर्चाही होत आहे. 96 वर्षाच्या रधवा देवीचा मृत्यू झाला होता. गुरुवारी रात्री 10 वाजता रधवा देवीच्या अंतिम संस्काराची तयारी सुरू होती. 107 वर्षाच्या जोधा महतो यांनी पत्नीला शेवटचा निरोप देण्यासाठी तिच्या कपाळाला कुंकू लावलं. त्यानंतर त्यांना जोराची उचकी आली अन् महतो जागीच कोसळले. त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

बुजुर्ग पती पत्नीची हे प्रेम कहानी पाहून सर्वच आश्चर्यचकीत झाले आहेत. अनेकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं आहे. लोक हळहळही व्यक्त करत आहेत. तसेच नातं असावं तर असं आणि साथ द्यावी तर अशी, अशी चर्चाही करत आहेत. या बुजुर्ग दाम्पत्याने लग्न झाल्यापासून 78 वर्ष एकमेकांना साथ दिली. प्रत्येक दु:खात आणि सुखात एकमेकांच्यासोबत होते. एकमेकांना समजून घेत होते. संघर्ष करत करत आपलं जीवन जगत होते. दोघांचाही स्वभाव अत्यंत प्रेमळ होता. त्यामुळे सर्वांनाच ते प्रिय होते. गावात त्यांच्याबद्दल आदरभाव होता. या दोघांनाही दोन मुलं आणि चार मुली तसेच नातवंडं आहेत.

अन् महतो अचानक कोसळले

वयोमानामुळे रधवा देवींचा मृत्यू झाला. गुरुवारी संध्याकाळी त्यांनी वयाच्या 96व्या वर्षी जगाचा निरोप झाला. पत्नी गेल्याचा जोधा महतो यांना प्रचंड धक्का बसला. त्यांना काय करावं सूचेना. डोळ्यातून पाणीही येत नव्हतं. ते शॉक लागल्यासारखे बसून होते. 78 वर्षाची साथ एकाएकी सुटली. त्यामुळे आता जगायचं कसं? असा सवाल महतो यांच्या पुढे निर्माण झाला.

इकडे रधवा देवींच्या अंतिम संस्काराची तयारी सुरू होती. सर्व तयारी झाली. आता प्रेत उचललं जाणार होतं. त्यापूर्वी महतो यांना कुणी तरी पत्नीच्या कपाळाला शेवटचं कुंकू लावायला सांगितलं. महतो यंनी आपल्या प्रिय पत्नीला अखेरचं निरखून पाहिलं. तिच्या कपाळाला भलं मोठं कुंकू लावलं. कुंकू लावताना महतो यांच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. कुंकू लावल्यानंतर अचानक महतो यांना उचकी आली आणि ते खाली कोसळले. महतो यांचा जागीच मृत्यू झाला.

एकाच चितेवर अंत्यसंस्कार

महतो खाली कोसळल्यानंतर गावकऱ्यांनी तात्काळ धाव घेऊन त्यांना शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला. डॉक्टरांना पाचारण केलं. डॉक्टरांनी महतो यांना तपासले आणि त्यांना मृत घोषित केलं. या घटनेमुळे एकच हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यानंतर गावकऱ्यांनी बँडबाजा वाजवत दोघा पती पत्नीची अंत्ययात्रा काढली. स्मशानभूमीत एकाच चितेवर दोघांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. रधवा देवी आणि जोधा महतो यांचा छोटा मुलगा सुरेश कुश्वाहा याने यावर प्रतिक्रिया दिली आहे. आई वडिलांचं एकमेकांवर प्रचंड प्रेम होतं. दोघांनीही मरेपर्यंत एकमेकांना साथ दिली. ढोल ताशे वाजवून आम्हीही त्यांनना अखेरचा निरोप दिला.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.