Marathi News National Oman connection of suspicious boat on Harihareshwar beach, red alert across state, 10 important things to know
Raigad Boat: हरीहरेश्वर समुद्र किनाऱ्यावरच्या संशयास्पद बोटीचे ओमान कनेक्शन, राज्यभरात रेड अलर्ट, जाणून घ्या 10 महत्त्वा्च्या गोष्टी
ही स्पीड बोट सापडण्यामागे कोणताही दहशतवादी अँगल नसल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सणासुदीचे दिवस असल्याने यातील कोणतीही शक्यता नाकारता येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ही बोट मस्कतवरुन युरोपला जात होती. २६ जून २०२२ रोजी या बोटीचे इंजिन निकामी झाले होते, त्यानंतर ही बोट भरकटत हरीहरेश्वर किनाऱ्याला लागली असल्याची माहिती कोस्टगार्डने दिल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले.
संशयास्पद बोटीबाबत १० अपडेट्स Image Credit source: social media
रायगड- हरीहरेश्वर (Harihareshwar)समुद्रकिनाऱ्यावर सापडलेली बोट ही ओमानची (Oman connection)असल्याची माहिती समोर आली आहे. ही बोट भरकटलेली होती. नेपच्युन मेरिटाईम सिक्युरिटी कंपनीने ही माहिती दिली आहे. जूनमध्ये ओमानच्या समुद्रात काही बोटी भरकटल्या होत्या, त्यापैकी एक बोट असण्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे. या बोटीवर 3 एके 47 रायफली ( AK 47 rifles)आणि जिवंत काडतुसांचा साठा हाती लागला होता. त्यानंतर सणासुदीच्या दिवसांमुळे राज्यभरात पोलिसांकडून हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यभरातील समुद्रकिनाऱ्यांवर सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे.
Maharashtra: Suspicious boat found near Harihareshwar Beach in Raigad
ही स्पीड बोट सापडण्यामागे कोणताही दहशतवादी अँगल नसल्याची माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सणासुदीचे दिवस असल्याने यातील कोणतीही शक्यता नाकारता येत नाही असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. ही बोट मस्कतवरुन युरोपला जात होती. 26 जून 2022 रोजी या बोटीचे इंजिन निकामी झाले होते, त्यानंतर ही बोट भरकटत हरीहरेश्वर किनाऱ्याला लागली असल्याची माहिती कोस्टगार्डने दिल्याचे त्यांनी सभागृहात सांगितले. कोस्टगार्ड आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या संपर्कात असून या बोटीची चौकशी करण्यात येत असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. बोटीच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.
सशंयास्पद बोटीबाबतच्या दहा महत्त्वाचे मुद्दे
रायगडच्या समुद्रकिनाऱ्यावर सापडली ओमानची बोट
हरीहरेश्वरमध्ये सापडलेल्या बोटीत 3 एके 47 रायफली आणि जिवंत काडतूसं