Rajasthan Omicron | महाराष्ट्रानंतर ओमिक्रॉनची राजस्थानमध्ये धडक, 9 जणांना लागण, देशात 21 जण बाधित

कोरोनाचे नवे रुप अर्थात ओमिक्रॉन या विषाणूचा प्रसार आता महाराष्ट्रानंतर राजस्थानपर्यंत पोहोचला आहे. राजस्थानमधील जयपूरमध्ये एकूण 9 जणांना ओमिक्रॉन विषाणूची लागण झाली आहे. येथील आरोग्य विभागाने याची पुष्टी केलीय.

Rajasthan Omicron | महाराष्ट्रानंतर ओमिक्रॉनची राजस्थानमध्ये धडक, 9 जणांना लागण, देशात  21 जण बाधित
OMICRON
Follow us
| Updated on: Dec 05, 2021 | 10:56 PM

जयपूर : कोरोनाचे नवे रुप अर्थात ओमिक्रॉन या विषाणूचा प्रसार आता महाराष्ट्रानंतर राजस्थानपर्यंत पोहोचला आहे. राजस्थानमधील जयपूरमध्ये एकूण 9 जणांना ओमिक्रॉन विषाणूची लागण झाली आहे. येथील आरोग्य विभागाने याची पुष्टी केलीय. या नऊ जणांपैकी चार रुग्ण एकाच कुटुंबातील असून बाकीचे पाच बाधित जयपूरमधील आदर्श नगरातील रहिवाशी आहेत. हे सर्व बाधित दक्षिण आफ्रिकेतून परतले होते. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे.

देशातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांचा आकडा 21 वर पोहोचला

राजस्थानधील आरोग्य विभागाचे सचिव वैभव गलरीया यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ओमिक्रॉनबाधित नऊ जणांच्या लाळेचे नमुने जिनोमिक सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले होते. त्यानंतर त्यांना ओमिक्रॉन विषाणूची बाधा झाल्याचे समोर आले आहे. या नऊ नव्या रुग्णांव्यतिरिक्त आज महाराष्ट्रातील पुणे आणि पिंपरी चिंचवड या शहरांत सात नवे ओमिक्रॉनग्रस्त आढळले. या सर्व रुग्णांना मिळून आता देशातील ओमिक्रॉनबाधित रुग्णांचा आकडा 21 वर पोहोचला आहे.

ओमिक्रॉनची पाच राज्यांत धडक  

देशात पहिला रुग्ण कर्नाटकमध्ये आढळला होता. त्यानंतर त्याचा प्रसार गुजरातमध्येदेखील झाल्याचे समोर आले. राजधानी दिल्लीमध्येदेखील ओमिक्रॉनचा एक रुग्ण आढळलेला आहे. त्यानंतर महाराष्ट्रातदेखील आठ ओमिक्रॉनचे रुग्ण आढळलेले आहेत. यामध्ये आता राजस्थानमधील नऊ रुग्णांची भर पडली आहे.

महाराष्ट्रात ओमिक्रॉनचे सात नवे रुग्ण

राज्यात डोंबिवलीनंतर पुण्यात ओमिक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत. पुण्यात एक तर पिंपरी-चिंचवडमध्ये सहा अशा एकूण सात रुग्णांची पुणे जिल्ह्यात नोंद करण्यात आलीय. या सर्व रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. पिंपरी चिंचवडमधील सहा रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नाहीत. तरीदेखील खबरदारी म्हणून त्यांना क्वॉरन्टाईन करण्या आलंय. तसेच त्यांच्यावर उपाचार सुरु आहेत.

इतर बातम्या :

Omicron : राज्यात आणखी 7 जणांना ओमिक्रॉन, पिंपरी-चिंचवडमध्ये 6, पुण्यात 1 ओमिक्रॉनबाधित

Omicron cases: धोका वाढला! पिंपरी-चिंचवडमध्ये दोन लहान मुलींना ओमिक्रॉनची लागण, आरोग्य विभागाचे धाबे दणाणले

पुण्यात 1 पिंपरी चिंचवडमध्ये 6 ओमिक्रॉनबाधित, लस घ्या अन् कोरोना नियम पाळा; आयुक्त राजेश पाटील यांचे आवाहन

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.