भारतीय हवाई दलाची ताकद आणखी वाढणार, 4 नोव्हेंबरला मिळणार 3 नवी राफेल लढाऊ विमानं
सोमवारी यासंबंधी सूत्रांनी माहिती दिली. हे तीन नवीन राफेल फ्रान्समधून थेट विमानाने भारतात पाठवले जाणार आहेत.
नवी दिल्ली : भारतीय हवाई दलाची (Indian Airforce) ताकद आता आणखी वाढणार आहे. कारण 4 नोव्हेंबरला आणखी तीन नवीन राफेल (Rafale) हवाई दलात दाखल होणार आहे. सोमवारी यासंबंधी सूत्रांनी माहिती दिली. हे तीन नवीन राफेल फ्रान्समधून थेट विमानाने भारतात पाठवले जाणार आहेत. (on November 4 iaf to receive three more Rafael combat aircraft)
हे नवीन विमान फ्रान्समधील इस्ट्रेसहून गुजरातच्या जामनगर इथं दाखल होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर या प्रवासादरम्यान फ्रेंच एअर फोर्सचे मिड एअर रिफाईलिंग विमानही त्यांच्यासोबत असणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रवासासाठी भारतीय हवाई दलाच्या वैमानिकांना फ्रान्समधील सेंट दिजिअर एअरबेसवर प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ही 3 नवीन विमानं हवाई दलात सामिल झाल्यानंतर भारताकडे एकूण 8 राफले असणार आहेत. 29 जुलै रोजी भारताने पाचवं राफेल विमान घेतलं होतं.
दरम्यान, या विमानांना अंबाला इथे 10 सप्टेंबरला झालेल्या कार्यक्रमात ‘गोल्डन अॅरो स्क्वॉड्रन’ मध्ये सहभागी करण्यात आलं होतं. खरंतर, भारताने फ्रान्सबरोबर 36 राफेल विमानांचं अधिग्रहण करण्याचा करार केला आहे. या कराराची एकूण किंमत 59 हजार कोटी इतकी आहे.
इतर बातम्या –
अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची मालमत्ता खरेदी करण्यासाठी लोकांची उत्सुकता, सफेमाकडून 17 संपत्तीचा लिलाव
एसटी कामगारांना काम करायला नेलं होतं की मरायला?’, निलेश राणेंचा सरकारला संतप्त सवाल
दिल्लीत नवी ‘मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री’ सुरु करण्यावर बंदी, मुख्यमंत्री केजरीवालांचा मोठा निर्णय
VIDEO: Girish Mahajan | भाजप कार्यकर्त्यांची काळजी खडसेंनी करु नये : गिरीश महाजनhttps://t.co/PAW0zG33be#GirishMahajan #BJP #EknathKhadse
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 2, 2020
(on November 4 iaf to receive three more Rafael combat aircraft)