सर्वसामान्य गॅसवरच, व्यावसायिक LPG गॅस सिलेंडर स्वस्त, किती स्वस्त झाला LPG गॅस?
तेल कंपन्यांनी किंमतीमध्ये सुधारणा केल्यानंतर सोमवार 1 जुलैपासून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 30 रुपयांनी स्वस्त झाली. मात्र, घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीमध्ये कोणतही बदल झालेला नाही. त्यामुळे सर्व सामन्यांना महागडा गॅस सिलिंडरच खरेदी करावा लागणार आहे.
देशात तेल विकणाऱ्या कंपन्यांनी सोमवारी 1 जुलै 2024 रोजी एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी केल्या आहेत. सुमारे 30 रुपयांनी या किमती कमी केल्या आहेत. LPG गॅसच्या कमी केलेल्या किमतीमुळे छोटे हॉटेल दुकानदार, रेस्टॉरंट, स्वयंपाकगृहे यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, घरगुती एलपीजी सिलिंडरधारकांना यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडर धारकांना आहे त्याच किमंतीमध्ये गॅस मिळणार आहे. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये वापरल्या जाणाऱ्या व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे वजन 19 किलो आहे. तर, घरगुती LPG सिलेंडरचे वजन 14.2 किलो आहे. त्यामुळे घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही.
मुंबईत एलपीजी सिलेंडर 1598 रुपयांना मिळणार
तेल कंपन्यांनी किमतीत केलेल्या बदलानंतर सोमवार, १ जुलैपासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरची किंमत 30 रुपयांनी स्वस्त झाली आहे. त्यामुळे आता दिल्लीमध्ये व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडर 1676 रुपयांऐवजी 1646 रुपयांना मिळणार आहे. तर, कोलकात्यात 1756 रुपयांना एलपीजी गॅस सिलिंडर मिळेल. त्याची किंमत पूर्वी 1787 रुपये होती.
देशाची औद्योगिक राजधानी असलेल्या मुंबईत एलपीजी गॅस सिलेंडरची किंमत 31 रुपयांनी कमी झाली आहे. 1629 रुपयांन मिळणारा एलपीजी गॅस सिलिंडर आता 1598 रुपयांना मिळेल. चेन्नईमध्ये 1809.50 रुपयांना सिलिंडर उपलब्ध आहे.
घरगुती एलपीजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत कपात नाही
घरगुती गॅस सिलेंडरचे वजन 14.2 किलो असते. मात्र, गॅस सिलेंडरच्या किंमतीत कोणतही बदल करण्यात आलेला नाही. 9 मार्च 2024 रोजी गॅस सिलेंडरच्या किंमतीत शेवटचा बदल करण्यात आला. घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 100 रुपयांनी कमी करण्यात आली होती. दिल्लीमध्ये घरगुती गॅस सिलेंडर 803 रुपये आणि मुंबईत 802.50 रुपयांना मिळत आहे. कोलकात्यात 829 रुपये तर चेन्नईमध्ये 818.50 रुपयांना घरगुती गॅस सिलेंडर मिळत आहे.
दिल्लीत घरगुती एलपीजी सिलेंडर 1103 रुपयांना मिळत होता
दिल्लीमध्ये 1 जून 2023 रोजी घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत 1103 रुपये होती. मात्र, 30 ऑगस्ट 2023 रोजी कंपन्यांनी त्यात 200 रुपयांची मोठी कपात जाहीर केली. त्यामुळे त्यांची किंमत 903 रुपयांपर्यंत खाली आली होती. यानंतर पुन्हा 9 मार्च 2024 रोजी कंपन्यांनी किंमत 100 रुपयांनी कमी केली होती. त्यामुळे आता तिथे 803 रुपयांना घरगुती गॅस सिलेंडर मिळत आहे.