मधुचंद्राच्या रात्री पती-पत्नीचा मृत्यू, कारण वाचून बसेल धक्का

उत्तर प्रदेशातील बहराइचमध्ये लग्नाच्या पहिल्या रात्री वधू-वराचा एकत्र मृत्यू झाला आहे. नवविवाहित जोडपे नवीन आयुष्याला सुरुवात करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला आहे. दोघांवर एकत्रच अंतिम संस्कारही करण्यात आले.

मधुचंद्राच्या रात्री पती-पत्नीचा मृत्यू, कारण वाचून बसेल धक्का
Follow us
| Updated on: Jun 06, 2023 | 4:50 PM

लखनऊ : उत्तर प्रदेशातील बहराईच जिल्ह्यात घडलेल्या घटनेमुळे अनेकांना लोकांना धक्का बसला आहे. लग्न झाल्यामुळे दोन परिवार आनंदात होते. लग्नात कोणतीही विघ्न नव्हते. सर्व काही सुरळीत झाले होते. मग मधुचंद्राच्या रात्री नवविवाहित दाम्पत्य खोलीत गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी दोघांचे मृतदेह दिसले. त्या दोघांचे मृतदेह हनिमूनच्या बेडवर पडलेले होते. या घटनेमुळे नवविवाहित दाम्पत्याच्या घरातील लग्नाच्या आनंदाचे शोकात रुपांतर झाले. मग दोघांवर एकाच चितेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. वैद्यकीय शास्त्रासाठी संशोधनाचा हा विषय बनला आहे.

कशामुळे झाला मृत्यू

बहराइच जिल्ह्यातील तेपरहानपुरवा गोधिया गावात राहणारा 22 वर्षीय प्रताप यादव याचा विवाह 20 वर्षीय पुष्पासोबत झाला होता. मधुचंद्राच्या दुसऱ्या दिवशी खोलीत मृतावस्थेत आढळलेल्या नवविवाहित दाम्पत्याचा मृत्यू हार्ट अटॅकने झाला, हे शवविच्छेदन अहवालातून स्पष्ट झाले आहे. परंतु तरुण विवाहित जोडप्याचा एकाच रात्री हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू कसा होऊ शकतो? असा सवाल अनेकांच्या मनात आहे.

हे सुद्धा वाचा

तज्ज्ञांनी सांगितले कारण

पुष्पा आणि प्रताप यांनी सकाळी दोघांची खोली उघडली नाही. अनेकदा ठोठावल्यानंतरही दोघांची खोली न उघडल्याने कुटुंबियांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. तेथे दोघेही बेडवर मृतावस्थेत सापडले. वधू-वरांच्या मृत्यूमुळे घरातील लोकांना मोठा धक्का बसला. घरातील सदस्यांचे अश्रू थांबत नव्हते.

लग्नापूर्वीपासूनच ओळखत होते

प्रताप, पुष्पा दोघे एकमेकांना ओळखत होते. दोघेही लग्नामुळे आनंदी होते. या लग्नावर कुणाचाही आक्षेप नव्हता. रात्री उशिरापर्यंत नाच-गाणे सुरू होते. रात्री उशिरा सर्वांनी जेवण केले. १ जून रोजी हा विवाह सोहळा झाला होता.

पोलीस काय म्हणतात

पोलिस अधीक्षक प्रशांत वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोस्टमॉर्टम अहवालात पती-पत्नी दोघांनाही एकाच वेळी हृदयविकाराचा झटका आल्याचे स्पष्ट झाले आहे. या जोडप्याला आधी हृदयविकाराचा त्रास नव्हता. या दाम्पत्याच्या मृत्यूचे गूढ उकलण्यासाठी दोन्ही मृतदेहांचे व्हिसेरा लखनौ येथील राज्य न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत पुढील तपासणीसाठी जतन करण्यात आले आहेत. दोघांच्याही अंगावर जखमेच्या खुणा नाही. यामुळे कोणत्याही प्रकाराच्या घातपाताची शक्यता नाही.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.