Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

देशात पुन्हा एकदा प्लास्टिकच्या नोटांची चर्चा, पाहा कुठल्या देशात वापरले जातात अशा नोटा

Plastic Notes : देशात पुन्हा एकदा प्लास्टिकच्या नोटांबाबत चर्चा होत आहे. प्लास्टिक नोटा भारतात सुरु केल्या जाऊ शकतात का याचा अभ्यास २०१८ साली रिझर्व्ह बँकेकडून सुरु करण्यात आला होता. पण त्यावर अजून तरी कुठलीही शक्यता दिसत नाही. आज संसदेत उत्तर देताना अर्थराज्य मंत्र्यांनी ते स्पष्ट केले.

देशात पुन्हा एकदा प्लास्टिकच्या नोटांची चर्चा, पाहा कुठल्या देशात वापरले जातात अशा नोटा
Follow us
| Updated on: Feb 07, 2024 | 9:13 PM

Plastic Currency : देशात सध्या प्लास्टिकच्या नोटांची चर्चा आहे. चलनात प्लास्टिकच्या नोटा येण्याची चर्चा सुरु आहे. २०२८ मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) प्लास्टिकच्या नोटांवर अभ्यास सुरू केला होता. तेव्हापासून याबाबत वेगवेगळ्या चर्चा होत आल्या आहेत. सरकारने सध्या तरी प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचा कोणताही निर्णय घेतला नसल्याचे म्हटले आहे. सरकारकडून नेहमीच बनावट नोटांना आळा घालण्याच्या प्रयत्न असतो. पण तुम्हाला माहित आहे की अनेक देशांमध्ये प्लास्टिकच्या नोटा वापरल्या जात आहे. बनावट नोटांना आळा घालण्यासाठी देखील हे पाऊल उचलले जावू शकते. प्लास्टिकच्या नोटांचे काही फायदे आहेत तर काही तोटे देखील आहेत. चला पाहुया प्लास्टिकच्या नोटा कोणत्या देशात वापरले जातात?

प्लास्टिकच्या नोटा चलनात आणण्याचा कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली आहे. त्यामुळे भारतात तरी सध्या प्लास्टिकच्या नोटा येणार नसल्याचं स्पष्ट झाले आहे. आता आपण जगातील 23 अशा देशांबाबत चर्चा करणार आहोत जेथे प्लास्टिकच्या नोटा वापरल्या जातात. यामध्ये 6 देश असे आहेत ज्यांनी त्यांच्याकडच्या सर्व नोटा या प्लास्टिकच्या केल्या आहेत.

कोणत्या देशात कधी पासून वापरले जातात प्लास्टिकच्या नोटा

ऑस्ट्रेलिया १९८८ (पहिला देश)

न्यूझीलंड १९९९

रोमानिया २००५

पापुआ न्यू गिनी १९७५

व्हिएतनाम २००३

ब्रुनेई २००४

कागदी आणि प्लास्टिकच्या नोटा वापरणारे देश

– ब्राझील

– चीन

– हाँगकाँग

– इंडोनेशिया

– इस्रायल

– लेबनॉन

– मलेशिया

– मेक्सिको

– नेपाळ

-निकाराग्वा

– पोलंड

– सिंगापूर

– श्रीलंका

– थायलंड

– युक्रेन

– उरुग्वे

प्लास्टिकच्या नोटांचे फायदे काय

प्लास्टिकच्या नोटा या टिकाऊ असतात आणि सहज खराब देखील होत नाहीत. त्या ओल्या झाल्या तरी खराब होत नाहीत. याशिवाय बनावट नोटांना देखील आळा बसतो.

प्लास्टिकच्या नोटांचे तोटे

कागदी नोटांपेक्षा प्लास्टिकच्या नोटा महाग असतात. त्या रिसायकल करणे देखील कठीण असतात. प्लास्टिकच्या नोटा या पर्यावरणासाठी हानिकारक असू शकतात.

भारतात चर्चा कधी सुरू झाली?

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 2018 मध्ये प्लास्टिकच्या नोटा वापरता येऊ शकतात का यावर अभ्यास सुरु केला होता. पण यावर अजून तरी कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.

'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले
'...त्यात तोंड घालू नका', धस दमानिया आणि तृप्ती देसाईंवर भडकले.
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद
दिल्लीचा तख्त रखायचा असेल तर.., मुनगंटीवारांनी पुन्हा व्यक्त केली खदखद.
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची
'एप्रिल फूल' डेला आपल्याकडे 'अच्छे दिन' म्हणतात - आदित्य ठाकरेंची.
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी
पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवरून प्रवास करताय? तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी.
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना
देशमुख कुटुंबाच्या भेटीनंतर अभिनेते सायाजी शिंदेंनी सांगितल्या भावना.
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका
'उबाठाचा पोपट अन् रडत राऊत...', चित्रा वाघ यांची राऊतांवर जहरी टीका.
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा
कुणाल कामराने पुन्हा एकदा सरकारला डिवचलं, 'त्या' ट्वीटची चर्चा.
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट
'धनंजय मुंडे माझ्या घरी आले अन्...', अंजली दमानियांचा मोठा गौप्यस्फोट.
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं
2 दिवस महिलेच्या मृतदेहासोबतच राहीला, मृतदेहा शेजारी बसून जेवणही केलं.
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका
धनंजय देशमुख आज केज पोलिसांना भेटणार; जेल प्रशासनावर उपस्थित केली शंका.