Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘वन नेशन वन इलेक्शन’ विधेयक लोकसभेत स्वीकारले, विरोधात पडली इतकी मते

one nation one election: केंद्रीय कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी घटनेतील 129 संशोधन विधेयक 2024' लोकसभेत मांडले. या विधेयकावर इलेक्ट्रॉनिक्स वोटींग मशीनने मतदान घेण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 220 आणि विरोधात 149 मते पडली.

'वन नेशन वन इलेक्शन' विधेयक लोकसभेत स्वीकारले, विरोधात पडली इतकी मते
One Nation One Election
Follow us
| Updated on: Dec 17, 2024 | 2:16 PM

one nation one election: संसदेत लोकसभेत मंगळवारी ‘वन नेशन, वन इलेक्शन’ विधेयक मांडण्यात आले. कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी घटनेतील 129 संशोधन विधेयक 2024′ लोकसभेत मांडले. या विधेयकावर इलेक्ट्रॉनिक्स वोटींग मशीनने मतदान घेण्यात आले. विधेयकाच्या बाजूने 220 आणि विरोधात 149 मते पडली. एकूण 369 सदस्यांनी मतदान केले. यानंतर विरोधी सदस्यांनी गोंधळ घातला. या प्रक्रियेवर आक्षेप घेतला. त्यावेळी गृहमंत्री अमित शाह यांनी आक्षेप असेल तर मतपत्रिकेद्वारे मतदान करण्याचे सांगितले. यावर लोकसभेचे अध्यक्ष म्हणाले की, आम्ही आधीच सांगितले होते की, जर एखाद्या सदस्याला तसे वाटत असेल तर तो मतपत्रिकेद्वारे त्याचे मत देऊ शकतो. त्यानंतर मतपत्रिकेवर मतदान करण्याचा निर्णय घेण्यात आला.

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी इलेक्रॉनिक मतदानाची प्रक्रिया सांगितली. त्यांनी म्हटले, तुम्ही जेव्हा मतदान करतात तेव्हा चूकन बटन दाबले गेले असेल तर मतपत्रिकेद्वारे तुम्ही ती चूक दुरुस्त करु शकतात. लोकसभेचे सेक्रेटरी जनरल तुमची पूर्ण व्यवस्था करेल. कारण अनेक खासदार नवीन आहेत. ते पहिल्यांदाच संसदेत आले आहेत.

लोकसभेची कारवाई स्थगित

मतपत्रिकेवर मतदान झाल्यानंतर लोकसभेत अध्यक्ष ओम बिर्ला यांना निकाल सांगितला. त्यांनी सांगितले प्रस्तावाच्या बाजूने 269 तर विरोधात 198 मते पडली. त्यानंतर कायदामंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी विधेयक लोकसभेत मांडले. त्यानंतर लोकसभेची कारवाई दुपारी तीन वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली.

हे सुद्धा वाचा

विधेयक जेसीपीकडे

एनडीएचे सर्व घटक पक्ष ‘वन नेशन, वन इलेक्शन’ च्या बाजूने आहेत. तर १४ पक्ष विरोधात आहे. सध्या हे बिल संसदीय समितीकडे (जेसीपी) पाठवण्यात आले आहे. त्यावर जेसीपीमध्ये चर्चा होईल. सर्व पक्षांची मते ऐकून घेतली जातील. त्यानंतर पुन्हा नवीन विधेयक तयार होईल. हे विधेयक संसदेत मांडण्यात येईल. दरम्यान, या विधेयकावर कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी सांगितले की, देशात एकाच वेळी निवडणुका घेण्याचे हे विधेयक राज्यांच्या शक्ती कमी करणार नाही. हे विधेयक पूर्णपणे संविधान अनुकूल आहे.

बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण...
बीड पोलिसांच्या वर्दीवर आता आडनाव दिसणार नाही! कारण....
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्
पुरस्कार विजेत्या शेतकऱ्यानं मृत्यूला कवटाळल, 3 पानांची सुसाईड नोट अन्.
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल
बारावीच्या 175 उत्तरपत्रिका शिक्षिकेच्याच घरी जळाल्या, व्हिडीओ व्हायरल.
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी
'..गरज काय? औरंगजेबाची कबर नष्ट करा', शिवसेनेच्या खासदाराची मोठी मागणी.
VIDEO : धक्कादायक! गावातील विहिरीत डोकं नसलेला मृतदेह पाहिला अन्...
VIDEO : धक्कादायक! गावातील विहिरीत डोकं नसलेला मृतदेह पाहिला अन्....
'जनतेच्या मनातील...', धंगेकरांच्या समर्थकांनी भाजपच्या रासनेंना डिवचलं
'जनतेच्या मनातील...', धंगेकरांच्या समर्थकांनी भाजपच्या रासनेंना डिवचलं.
'लाडकी बहीण'मुळे कडकी, रामदास कदमांची कबुली, 'योजना बंद केली तर...'
'लाडकी बहीण'मुळे कडकी, रामदास कदमांची कबुली, 'योजना बंद केली तर...'.
'लाडक्या बहिणीं'ना 2100 रूपये मिळणार की नाही? आदिती तटकरेंनी सांगितलं
'लाडक्या बहिणीं'ना 2100 रूपये मिळणार की नाही? आदिती तटकरेंनी सांगितलं.
'खोक्या' पूर्ण फसला, प्रयागराजमधून 'पॅक', थेट विमानानं मुंबईत आणणार
'खोक्या' पूर्ण फसला, प्रयागराजमधून 'पॅक', थेट विमानानं मुंबईत आणणार.
बीड पॅटर्नची पुनरावृत्ती, रस्त्यावर नग्नावस्थेत आढळला मृतदेह
बीड पॅटर्नची पुनरावृत्ती, रस्त्यावर नग्नावस्थेत आढळला मृतदेह.