बागेश्वर बाबा अडचणीत, दरबारात आजारी महिलेचा मृत्यू

आठवडाभर रोज या ठिकाणी परिक्रमा करत होते. बायको नीट खात-पीत होती. बुधवारी परिक्रमाही करण्यात आली. दरबार लागणार होते. मी पण पत्नीसोबत पोहोचलो होतो. तिची प्रकृती चांगली होती.

बागेश्वर बाबा अडचणीत, दरबारात आजारी महिलेचा मृत्यू
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 16, 2023 | 4:29 PM

छतरपूर : काही बाबा, साधू वेगवेगळ्या प्रकारचे चमत्कार करतात. अनेक जण आपणास दैवी देणगी मिळाल्याचे सांगतात. सध्या बागेश्वर धामचे कथाकार पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री चर्चेत आहेत. बागेश्वर महाराज (Bageshwar Dham)या नावाने प्रसिद्धी मिळवलेले धीरेंद्र शास्त्री (bageshwar dham sarkar) लोकांच्या मनात काय सुरु आहे, ते ओळखत असल्याचा दावा करतात. त्यांना लोकांच्या समस्या न सांगताच समजतात. त्या समस्यांचे उत्तर ते कागदावर लिहून देतात. त्यांच्या दरबारात जाऊन आले की नशीब बदलते, असा लोकांचा समज आहे. त्याच समजमुळे एका महिलेचा मृत्यू झाला आहे. किडनीच्या आजाराने त्रस्त ही महिला बागेश्वर धाममध्ये आली आहे. यामुळे बागेश्वर बाबा यांच्या अडचणीत भर पडणार आहे.

काय झाली घटना

हे सुद्धा वाचा

उत्तर प्रदेशच्या फिरोजाबाद जिल्ह्यातील ३३ वर्षीय नीलम उर्फ निलू आपल्या पती देवेंद्रसिंह सोबत बागेश्वर धाममध्ये आली होती. तिला किडनीचा आजार होता. बुधवारी सकाळी तिने जेवण केले. त्यानंतर बाबांना भेटण्यासाठी रांगेत उभी राहिली. त्याचवेळी महिलेचा मृत्यू झाल्याचं म्हटलं जातंय. जवळपास महिनाभर महिला पतीसोबत बागेश्वर धाममध्ये वास्तव्यास होती. किडनीच्या आजाराने त्रस्त असलेली महिला उपचारासाठी बागेश्वर धाममध्ये आली होती. रांगेत उभी होती. त्याचवेळी बेशुद्ध पडली. अन् मृत्यू झाला.

देवेंद्रसिंह यांनी सांगितले की, ते आठवडाभर रोज या ठिकाणी परिक्रमा करत होते. बायको नीट खात-पीत होती. बुधवारी परिक्रमाही करण्यात आली. दरबार लागणार होते. मी पण पत्नीसोबत पोहोचलो होतो. तिची प्रकृती चांगली होती. तिला दरबारात बसवल्यानंतर मी बाहेर आले. त्यानंतर रांगेत ती पडली. त्यावेळी पोलीस आले आणि म्हणाले, तुझ्या पत्नीला येथून घेऊन जा. त्यानंतर रुग्णवाहिकेने तिला रुग्णालयात नेले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

तरुणीही बेपत्ता

बागेश्वर धाम दरबारातून 28 वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याचे प्रकरणही समोर आले आहे. बेपत्ता कुमारी नीरज मौर्य 12 फेब्रुवारीला वडील ओमप्रकाशसोबत धामला पोहोचली होती. त्या दिवशी सकाळी १० वाजल्यानंतर ती कुठेच दिसली नाही. नीरज दरबारातून बेपत्ता झाल्याचे तिचे वडील सांगतात. त्यांनी लोकांना मोबाईल नंबर 8955492438 किंवा छतरपूर जिल्ह्यातील पोलीस स्टेशनवर माहिती देण्यास सांगितले आहे.

श्याम मानव यांचे आव्हान

आपल्या दिव्यशक्तीने चमत्कार घडवून आणण्याचा दावा बागेश्वर बाबांनी केला आहे. बागेश्वर बाबांच्या या आव्हानाला अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्याम मानव यांनी आव्हान दिलं आहे. बागेश्वर बाबांनी आपल्या दिव्यदृष्टीचा चमत्कार सिद्ध करून दाखवावा आणि 30 लाख रुपये घेऊन जावे, असं आव्हानच श्याम मानव यांनी बागेश्वर बाबांना दिलं होते.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.