केंद्र सरकार ऑनलाइन मोबाईल गेम बंद करण्याच्या तयारीत
online mobile games : केंद्र सरकार ऑनलाइन मोबाईल गेम बंद करण्याच्या तयारीत आहे. गाझियाबादमधील प्रकरणानंतर सरकारने मोबाईल गेमसंदर्भात नियमावली करण्याचाही निर्णय घेतला आहे. केंद्रीय मंत्र्यांनी यासंदर्भात माहिती दिली.
नवी दिल्ली : ऑनलाईन गेमिंगच्या माध्यमातून धर्मांतर केलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या माध्यमातून 400 जणांचं धर्मांतर करण्यात आल्याचा आरोप होत आहे. उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये उघड झालेल्या या प्रकाराचे धागेदोरे हे मुंब्रापर्यंत आले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गाझियाबाद पोलिसांचे एक पथक मुंब्रात आले. त्यांनी या प्रकरणी शहानवाज या आरोपीला रायगड जिल्ह्यात अटक केली. आता या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार मोबाईल गेमवर शिंकजा कसण्याच्या तयारीत आहे. यासंदर्भात केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी माहिती दिली.
काय म्हणाले मंत्री
गाझियाबादमध्ये ऑनलाइन गेमिंगद्वारे धर्मांतराचे प्रकरण समोर आल्यानंतर केंद्र सरकारने सर्व गेमिंग अॅप्सचे पुनरावलोकन करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, भारतात तीन प्रकारच्या मोबाईल गेमवर बंदी घालण्यात येणार आहे. तसेच ऑनलाइन बेटिंग अॅप्सही बंद होतील. त्यासाठी नियमांची ब्लू प्रिंट तयार करण्यात आली आहे.
कोणते गेम बंद होणार
- सट्टेबाजीचा समावेश असलेले गेम
- जे हानिकारक आहेत
- गेम जे व्यसनाधीन आहेत
ऑनलाइन गेमिंग फ्रेमवर्क
मंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले की, आम्ही प्रथमच ऑनलाइन मोबाईल गेमिंग संदर्भात एक फ्रेमवर्क तयार केला आहे. ज्यामध्ये आम्ही देशात 3 प्रकारच्या गेमला परवानगी देणार नाही. गुगलचे प्ले स्टोअर आणि ऍपलचे अॅप स्टोअर हे सध्याचे दोन मोठे ऍप्लिकेशन स्टोअर आहेत. त्यावरुन हे गेम काढण्यात येतील.
काय होता गाझिजाबादमधील प्रकार
गाझियाबादमधील कविनगर येथील १७ वर्षीय मुलाचे धर्मांतर करणाऱ्या मौलवी अब्दुल रहमान उर्फ नन्नी याला पोलिसांनी अटक केली आहे. रहमान याने ऑनलाइन गेमच्या माध्यमातून धर्मपरिवर्तन घडवल्याचा आरोप आहे. अब्दुल रहमान आणि ठाणे मुंब्रा येथील शाहनवाज मकसूद यांनी हा प्रकार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.
शहनवाज मकसूद हा बड्डो नावाच्या बनावट आयडीद्वारे ऑनलाइन गेमवर उपस्थित राहत होता. फोर्ट नाईट या ऑनलाइन गेममध्ये हिंदू मुलांना फसवण्याचे काम तो करत होता. हिंदू नावांची मुस्लीम मुलांचे आयडी बनवून तो स्वत: खेळत होता. खेळ खेळताना हिंदू मुले हरले की मग खरा खेळ सुरू होतो.