देशात 35 टक्के लोकांचेच पूर्ण लसीकरण; बूस्टर डोस देने अशक्य, एम्सचा दावा
कोरोना लसीकरणाची सध्याची परिस्थिती पाहाता, नागरिकांना लसीचा बूस्टर डोस देने अशक्य असल्याचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) म्हटले आहे.
नवी दिल्ली – कोरोना लसीकरणाची सध्याची परिस्थिती पाहाता, नागरिकांना लसीचा बूस्टर डोस देने अशक्य असल्याचे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (AIIMS) म्हटले आहे. याबाबत बोलताना ‘एआयआयएमएस’चे डॉक्टर एम. व्ही पद्म श्रीवास्तव यांनी सांगितले की, सध्या देशात मोठ्याप्रमाणात लसीकरण होत आहे. लसीकरणाचा वेग जरी वाढला असला तरी देखील आतापर्यंत देशातील केवळ 35 टक्के नागरिकांनाच लसीचे दोन डोस देण्यात आले आहेत. त्यामुळे अशा परिस्थितीत ज्या नागरिकांचे या आधीच लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत, त्यांना बूस्टर डोस देणे अशक्य आहे. तसे केल्यास देशात लसीचा तुटवडा जाणू शकतो.
श्रीवास्तव पुढे बोलताना म्हणाले की, ‘गेली दोन वर्ष देश कोरोनाचा सामना करत आहे. आता लसीकरणाला वेग आल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. भारतामध्ये मोठ्याप्रमाणात लसीकरण सुरू आहे. परंतु आतापर्यंत केवळ 35 टक्के लोकांचेच पूर्ण लसीकरण झाले आहे. ज्या व्यक्तीने अद्याप लसीचा एकही डोस घेतला नाही, अथवा एक डोस घेतला आहे, अशा व्यक्तींना लसीचा डोस देण्यास प्राथमिकता देण्यात येत आहे. त्यामुळे जर भारतामध्ये बूस्टर डोस देण्यास सुरुवात केली तर लसीचा तुटवडा जाणू शकतो’.
बूस्टर डोस आवश्यक
श्रीवास्तव यांनी म्हटले आहे की, कोरोना लसीच्या बूस्टर डोसची गरज आहे. कारण अनेकांनी कोरोनाच्या दोनही लसी घेऊन, त्यांच्यामध्ये कोरोनाविरोधी प्रतिपिंडे तयार झाले नसल्याचे अभ्यासातून समोर आले आहे. अशा परिस्थितीमध्ये बूस्टर डोसची आवश्यकता आहे. मात्र सध्या भारतामध्ये पूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांची टक्केवारी खूपच कमी आहे. त्यामुळे ज्या नागरिकांचे अद्याप लसीकरण झालेच नाही, त्यांचे लसीकरण करण्यास प्राधान्य दिले पाहिजे. कोरोना महामारीवर काम करणारा थिंकटॅंक याबाबत योग्य तो निर्णय घेईल अशी अपेक्षा आहे. दरम्यान यापूर्वी भारत बायोटेकचे अध्यक्ष डॉ. कृष्णा एला यांनी देखील म्हटले होते, की जर कोरोना व्हायरस हा म्यूटेट असेल तर बूस्टर डोस घेण्याची आवश्यकता आहे.
Covid Capsule: मेड-इन-इंडिया COVID कैप्सूलला आपत्कालीन वापरासाठी लवकरच मंजुरी मिळणार, सुरुवातीला 2000 ते 4000 रु किंमत असेल#COVID19 #CovidMedicinehttps://t.co/CyWbqa2M47
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 11, 2021
संबंधित बातम्या
डॉक्टर, वैद्यकीय सेवांचे होणार डिजिटायझेशन; नोंदणीला सुरुवात