जगात भारतासह फक्त 9 देशांकडे अणुबॉम्ब, इतर देश का नाही बनवत अण्वस्त्रे?
ज्या देशांकडे अणूबॉम्ब नाही, त्या देशांवर अण्वस्त्र हल्ला झाल्यावर काय करणार? या प्रश्नाचे उत्तर अण्वस्त्र प्रसार बंदी करारावर देण्यात आले आहे. त्यानुसार जर अण्वस्त्र नसलेल्या देशांवर हल्ला झाला तर ज्या देशांना अण्वस्त्र ठेवण्याचा अधिकार आहे, ते देश त्या देशांच्या मदतीसाठी जातील.
जगात 9 देशांकडे अण्वस्त्र आहेत. त्यात भारत, अमेरिका, रशिया, इंग्लंड, फ्रान्स, चीन, पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि इस्त्राइलचा समावेश आहे. सर्वात जास्त अण्वस्त्र रशियाकडे आहेत. 5580 अण्वस्त्र असून त्यानंतर अमेरिकेचा क्रमांक आहे. अमेरिकेकडे 5044 अण्वस्त्र आहे. संपूर्ण जगात एकूण 12,121 अण्वस्त्र आहेत. म्हणजेच जगातील एकूण अण्वस्त्रांपैकी 90% अण्सस्त्र रशिया आणि अमेरिकेकडे आहे.
अमेरिका, रशिया, चीन, भारत यांच्यासारख्या नऊ देशांकडेच अण्वस्त्र का आहेत? असा प्रश्न निर्माण होत आहे. या देशांशिवाय इतर अनेक देश मिलिट्री पॉवर आहे. तसेच त्यांची अर्थव्यवस्था चांगली आहे. त्यानंतर त्या देशांनी अणू बॉम्ब बनवले नाहीत.
करारापूर्वी त्या देशांकडे अण्वस्त्रे
जर्मनी, दक्षिण कोरिया, जापान आणि ऑस्ट्रेलिया यासारखे देश शक्तीशाली आहेत. त्यानंतर त्या देशांनी अणूबॉम्ब बनवला नाही. त्यामागे कारण न्युक्लियर नॉन-प्रोलिफेरेशन ट्रीटी(NPT) आहे. जगाला अण्वस्त्रपासून वाचवण्यासाठी 1968 मध्ये हा करार करण्यात आला. 1970 च्या दशकात तो लागू करण्यात आला. या करारावर 190 देशांनी सह्या केल्या आहेत. या करारानुसार अणू चाचणीवर बंदी आहे. या करारातंर्गत फक्त अमेरिका, रशिया, इंग्लंड, चीन आणि फ्रॉन्स यांनी अण्वस्त्र ठेवण्याचा अधिकार आहे. कारण या देशांची हा करार अस्तित्वात येण्यापूर्वी अणूचाचणी केली.
इतर देश अण्वस्त्रांशिवाय राहणार?
ज्या देशांकडे अणूबॉम्ब नाही, त्या देशांवर अण्वस्त्र हल्ला झाल्यावर काय करणार? या प्रश्नाचे उत्तर अण्वस्त्र प्रसार बंदी करारावर देण्यात आले आहे. त्यानुसार जर अण्वस्त्र नसलेल्या देशांवर हल्ला झाला तर ज्या देशांना अण्वस्त्र ठेवण्याचा अधिकार आहे, ते देश त्या देशांच्या मदतीसाठी जातील.
भारत, पाकिस्तानने कसे बनवले अण्वस्त्रे?
न्यूक्लियर नॉन-प्रोलिफेरेशन ट्रिटीनुसार अमेरिका, रशिया, ब्रिटेन, चीन आणि फ्रान्स अण्वस्त्र ठेऊ शकतात. मग भारत, पाकिस्तान, उत्तर कोरिया आणि इस्त्रायलने अणूचाचणी कशी केली? भारत आणि पाकिस्तानने अण्वस्त्र करारावर सही केली नाही. उत्तर कोरिया आधीपासून या कराराचा भाग आहे. परंतु अणूचाचणी केल्यानंतर तो करारातून बाहेर पडला. इस्त्रायलने गुपचूप अणूचाचणी केली आहे.