Opec प्लसने भारताला दिला झटका, अशावेळी खरा मित्रच येणार मदतीला
Opec oil production cut : मित्राच्या मदतीमुळे भारतातील महागाई दर राहील नियंत्रणात. Opec प्लसचा हा निर्णय जगावर परिणाम करणारा आहे. या कठीण काळात महागाई आणखी वाढेल. पण भारतावर त्याचा फार परिणाम होणार नाही.
Opec oil production cut : सौदी अरेबिया रशियासह जगातील अन्य ओपेक + देशांनी रविवारी अचानक तेल उत्पादनात प्रतिदिन 16 लाख बॅरलची कपात करण्याची घोषणा केली आहे. ओपेक + च्या या निर्णयानुसार, रशिया प्रतिदिन 5 लाख बॅरेल तेल उत्पादनात कपात करेल. ओपेक प्लस देशांच्या या निर्णयामुळे तेलाच्या किंमतीमध्ये वाढ होईल. अमेरिकेने ओपेक प्लसचा हा निर्णय योग्य नसल्याच मत नोंदवल आहे.
भारत एकूण गरजेच्या 80 टक्क्यापेक्षा जास्त तेल आयात करतो. त्यामुळे सहाजिकच ओपेक प्लसच्या या निर्णयाचा भारतीय तेल बाजारावर परिणाम होईल.
निर्णयाचा भारतावर परिणाम होणार नाही, कसा?
भारतीय तेल बाजाराशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं की, तेल उत्पादनात कपात करण्याच्या ओपेक प्लसच्या या निर्णयाचा भारतावर परिणाम होणार नाही. कारण भारत रशियाकडून तेल आयात वाढवेल. भारत-रशियामध्ये तेलाच्या पेमेंटमध्ये काही अडचणी आहेत. पण त्यावर मार्ग काढण्यासाठी दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु आहेत.
सवलतीवर तेल खरेदी
ओपेक प्लस संघटनेच्या निर्णयाचा फटका बसू नये, यासाठी भारतीय रिफाइन कंपन्या आधीपासून मिळालेल्या सवलतीवर रशियाकडून तेल खरेदी सुरु ठेवतील.
भारताला काय आश्वासन मिळालय?
भारतीय तेल कंपन्यांना जे चालू दर आहेत, त्या आधारावर तेल पुरवठा सुरु ठेवण्याच रशियाकडून आश्वासन देण्यात आलय, असं बाजाराशी संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितलं. भारतीय तेल कंपन्या अजूनही सवलतीच्या दरात रशियाकडून तेल खरेदी करतायत.
भारताच्या तेल आयातीत रशियाचा वाटा किती?
लंडन स्थित एनर्जी कार्गो ट्रॅकर वोर्टेक्सानुसार, मार्च महिन्यात भारताला सर्वात जास्त तेल पुरवठा रशियाने केला आहे. रशियाकडून सर्वाधिक तेल पुरवठ्याचा हा सलग सहावा महिना आहे. रशियाने मार्च महिन्यात भारताला प्रतिदिन 16 लाख बॅरल तेल निर्यात केलं. भारताच्या एकूण तेल आयातील 35 टक्के वाटा रशियाचा आहे. दोघांचा फायदा झाला
युक्रेन युद्ध सुरु झाल्यानंतर रशियावर अमेरिकेसह पाश्चिमात्य देशांनी अनेक निर्बंध घातले. अशावेळी रशियाने होणारा तोटा भरुन काढण्यासाठी भारतासह अन्य आशियाई देशांना तेल पुरवठा सुरु केला. यातून दोघांचा फायदा झाला. भारताला स्वस्तात तेल मिळालं. रशियाला मोबदल्यात पैसा मिळाला.