25 कोटीच्या आरोपावर समीर वानखेडेंना बाजुला ठेवलं पाहिजे? फडणवीस म्हणाले, चौकशी झालीच पाहिजे !
शेवटी ही स्ट्रॅटजीही असू शकते की एखाद्या अधिकाऱ्यावर सातत्याने आरोप करायचे जेणेकरुन त्या अधिकाऱ्याला चौकशीपासून बाजूला करता येईल. अशी पद्धत पाडणं योग्य नाही. आणि म्हणून प्रायमाफेसी केस असेल तर ते निर्णय घेतील.
नवी दिल्ली : क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणातील साक्षीदार किंवा पंच असलेले प्रभाकर साईल यांनी एनसीबीचे झोनल डायरेक्टर यांच्यासह पंच के पी गोसावी यांच्याबाबत केलेल्या 25 कोटींच्या डील प्रकरणावरुन एकच खळबळ उडाली आहे. याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जे काही आरोप लागले आहेत त्या आरोपांची चौकशी झालीच पाहिजे आणि ती योग्य प्रकारे होईल. जर एनसीबीला तसं वाटलं ही चौकशी होईपर्यंत त्यांना बाजूला ठेवलं पाहिजे तर ते तसा निर्णय घेतील. आज त्यांना तसं वाटलं नसेल, असे फडणवीस म्हणाले. (Opposition leader Devendra Fadnavis’s response to the Rs 25 crore allegation against Sameer Wankhede)
तसेच शेवटी ही स्ट्रॅटजीही असू शकते की एखाद्या अधिकाऱ्यावर सातत्याने आरोप करायचे जेणेकरुन त्या अधिकाऱ्याला चौकशीपासून बाजूला करता येईल. अशी पद्धत पाडणं योग्य नाही. आणि म्हणून प्रायमाफेसी केस असेल तर ते निर्णय घेतील. शेवटी यासंदर्भातील निर्णय करायला मी अधिकारी नाही आणि मला त्यात बोलण्याचा अधिकारही नाही. एनसीबीचं जे काही इंटरनल फँडिंग आहे त्या आधारावर ते निर्णय घेतील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
संजय राऊत यांना फडणवीसांचे प्रत्युत्तर
संजय राऊत कोणाची वकिली करताहेत, ड्रग्जवाल्यांची वकिली करतात का? हा सवाल माझा त्यांना आहे. ज्या मुंबईला महाराष्ट्राला ज्या प्रकारे ज्रग्जचा विळखा पडला आहे, तरुण पिढी बरबाद होत आहे. त्याच्या विरुद्ध लढायच्या ऐवजी जर संजय राऊतांसारखे लोक त्यांना समर्थन देत असतील तर ईश्वरच मालिक आहे ही परिस्थिती असणार आहे. मला त्यांना उत्तर देण्याची इच्छा नाही. त्यांना केवळ राजकारण करायचंय. संजय राऊत यांचा उद्देश इतकाच आहे की मूळ मुद्द्यांपासून सगळं भटकलं पाहिजे. मूळ मुद्द्यांवर चर्चा होऊ नये. संजय राऊत कधीही शेतकऱ्याबद्दल चकार शब्द बोलत नाहीत. मराठवाड्यात एवढा भयानक पाऊस झाला, शेतकऱ्याची परिस्थिती इतकी वाईट झाली, त्यांना एक नवा पैसा मिळत नाही त्याही बद्दल एक शब्द बोलत नाही. मला असं वाटतंकी मी त्यांना काय उत्तर देऊ, असे बोलत देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे.
नवाब मलिकांनी कोर्टात पुरावे सादर करावे
कुठल्याही इन्व्हेस्टिगेटिंग अधिकाऱ्याला वैयक्तिक टार्गेट करणं योग्य नाही. तुमच्याजवळ काही पुरावे असतील तर तुम्ही कोर्टात दिले पाहिजे कारण ऑनगोईंग केस आहे. ऑनगोईंग केसमध्ये संविधानिक पदावर बसलेला व्यक्ती बाहेर बोलतो पण कोर्टात मात्र पुरावे देत नाही, हे अतिशय चुकीचे आहेत. जे काही चाललेलं आहे त्यामध्ये प्रोसिक्युशनचे जे विटनेस आहेत त्यांची क्रेडिबिलिटी खराब करायचं काम जर सरकारी तंत्राने व्हायला लागलं तर यापुढे कुठलीच केस कुठेच टिकणार नाही. आणि एक नविन चुकीची पद्धत या ठिकाणी तयार होईल. नवाब मलिक हे संविधानिक पदावर बसलेले आहेत या पदावर बसलेल्या व्यक्तीने त्यांच्याकडे काही पुरावे असतील ते कोर्टात पुरावे सादर केले पाहिजे. दुसरीकडे वानखेडेंच्या पत्नीने सगळे पुरावे दिले आहेत, असे देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांच्या आरोपांवर उत्तर दिले. (Opposition leader Devendra Fadnavis’s response to the Rs 25 crore allegation against Sameer Wankhede)
इतर बातम्या