Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नितीश ना ममता, INDIA च्या संयोजन पदाच्या शर्यतीत ‘या’ नेत्याच नाव आघाडीवर, सर्वेचा चक्रावणारा कौल

INDIA च संयोजक कोण? या प्रश्नाच उत्तर अजूनही मिळालेलं नाही. चर्चेत असलेल्या नावांपैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार? या विषयी अजून स्पष्टता नाहीय.

नितीश ना ममता, INDIA च्या संयोजन पदाच्या शर्यतीत 'या' नेत्याच नाव आघाडीवर, सर्वेचा चक्रावणारा कौल
sharad pawar and uddhav thackeray
Follow us
| Updated on: Jul 24, 2023 | 3:04 PM

नवी दिल्ली : पुढच्यावर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांनी एकत्र येऊन ‘इंडिया’ नावाची आघाडी स्थापन केली आहे. ‘इंडिया’ च संयोजक कोण असणार? या प्रश्नाच अजूनही उत्तर मिळालेलं नाहीय. संयोजकाच्या नावावर अजून शिक्तामोर्तब झालेलं नाही. विरोधी पक्षांच्या या आघाडीच्या संयोजक पदासाठी नितीश कुमार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, राहुल गांधी आणि अन्य नेत्यांची नाव चर्चेत आहेत. चर्चेत असलेल्या नावांपैकी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार? या विषयी अजून स्पष्टता नाहीय.

विरोधी पक्षांच्या आघाडीचा संयोजक कोणाला बनवायच? यावरुन एक सर्वे झाला. त्यातून समोर आलेलं नाव सर्वांनाच चक्रावून सोडणारं आहे.

विरोधी पक्ष आघाडीचा चेहरा कोण?

विरोधी पक्षांच्या आघाडीच्या आतापर्यंत दोन बैठका झाल्या आहेत. एक बैठक पाटण्यात दुसरी बंगळुरुमध्ये झाली. बंगळुरुच्या बैठकीत आघाडीला INDIA हे नाव देण्यात आलं. या आघाडीत एकूण 26 पक्ष आहेत. सी वोटरने एक सर्वे केला. या सर्वेत संयुक्त विरोधी पक्ष आघाडीचा चेहरा कोण? या बद्दल प्रश्न विचारण्यात आला. INDIA च संयोजक कोणाला बनवलं पाहिजे? असा प्रश्न विचारण्यात आला.

या नावाला सर्वाधिक पसंती?

33 टक्के लोकांनी माहित नाही असं उत्तर दिलं. 12 टक्के लोकांनी नितीश,. 10 टक्के लोकांनी केजरीवाल, 6 टक्के लोकांनी शरद पवार, 8 टक्के लोकांनी ममता बॅनर्जीच नाव घेतलं. राहुल गांधी यांना या सर्वेत सर्वाधिक 31 टक्के पसंती मिळाली आहे. अशी अपेक्षा कोणीच केली नव्हती. राहुल गांधी नसतील, तर पंतप्रधानपदासाठी कोणाच्या नावावर चर्चा

याआधी दुसऱ्या सर्वेमध्ये लोकांनी विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून राहुल गांधी यांचं नाव सुचवलं होतं. सी वोटरनेच हा सर्वे केला होता. राहुल गांधी नसतील, तर विरोधी पक्षांकडून पंतप्रधानपदासाठी कोण दावेदार असेल? या प्रश्नावर 33 टक्के लोकांनी प्रियंका गांधी यांचं नाव सुचवलं होतं. 14 टक्के लोकांनी अरविंद केजरीवाल आणि तितक्याच लोकांनी नितीश कुमार यांचं नाव सुचवलं होतं. 10 टक्के लोकांनी ममता बॅनर्जी यांचं नाव सुचवलं होतं.

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.