महाराष्ट्रासह काही राज्यांना ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज

Weather Update in maharashtra: महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिक जिल्ह्याला आँरेज अलर्ट बुधवारी दिला आहे. तसेच पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, रत्नागिरी, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नांदेड, चंद्रपूर या जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे. राज्यातील अनेक भागांत बुधवारी पाऊस सुरु आहे.

महाराष्ट्रासह काही राज्यांना ऑरेंज अलर्ट, मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज
Follow us
| Updated on: Jul 03, 2024 | 2:21 PM

Weather Update in maharashtra: देशभरात मान्सून सक्रीय झाला आहे. परंतु काही राज्यांमध्ये पाऊस नाही तर काही राज्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रासह काही राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात यलो आणि ऑरेंज अलर्ट दिला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार अरुणाचल प्रदेश, आसम आणि मेघालयात 4 जूनपर्यंत मुसळधार पावसाचा अंदाज आहे. पश्चिम बंगाल, सिक्किम, नगालँड, मणिपूर, मिझोरम आणि त्रिपुरामध्ये 05 जुलैपर्यंत तर कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि कर्नाटकात 6 जुलैपर्यंत पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे.

महाराष्ट्रात या ठिकाणी अलर्ट

महाराष्ट्रातील पुणे आणि नाशिक जिल्ह्याला आँरेज अलर्ट बुधवारी दिला आहे. तसेच पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सातारा, रत्नागिरी, नंदुरबार, बुलढाणा, अकोला, वाशिम, अमरावती, नांदेड, चंद्रपूर या जिल्ह्यात यलो अलर्ट दिला आहे. राज्यातील अनेक भागांत बुधवारी पाऊस सुरु आहे.

सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस

सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात चांदोली धरण परिसरामध्ये गेले दोन दिवस अतिवृष्टीचा पाऊस होत आहे. त्यामुळे चांदोली धरणातून वारणा नदीपात्रात 675 क्युसेक्सने पाणी सोडले आहे. तसेच या परिसरामध्ये पाऊस चालू असल्याने वारणा नदी तुडुंब भरून वाहत आहे. नदीचे पात्र बाहेर पडत आहे. तर कोकरूड ते रेठरे बंधारावर पाणी येऊ लागले आहे. तर काही छोटे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वारणा नदी तुडुंब भरून वाहत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

हे सुद्धा वाचा

सांगली जिल्ह्यातील चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सलग दुसऱ्या दिवशी अतिवृष्टी झाली आहे. गेल्या 24 तासात 105 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. काल 90 मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली होती. त्यामुळे धरणात मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने धरणाची पाणीपातळी झपाट्याने वाढू लागली आहे. आज अखेर 700 मिलिमीटर पावसाची येथे नोंद झाली आहे. सध्या धरणात 6 हजार 982 क्युसेक्स पाण्याची आवक होत आहे तर अतिवृष्टीमुळे परिसरातील ओढे- नाले तुडुंब भरून वाहू लागले आहेत.

नांदेडमध्ये दुबार पेरणीचे संकट टळले

नांदेड जिल्ह्यात पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांपुढे दुबार पेरणीच संकट उभे टाकले होते. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला होता. मात्र नांदेडमध्ये विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावल्याने पिकाला जीवनदान मिळाले आहे. जिल्ह्यात 67 टक्के इतक्या पेरण्या झालेल्या आहेत. काही भागात पाऊस नसल्याने शेतकऱ्यांनी अद्यापही पेरणी केलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना आणखी मोठ्या पावसाची प्रतीक्षा लागलेली आहे.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.