अर्थमंत्र्यांनी संसदेत त्यांचं भाषण ऐकणाऱ्या खासदारांचीही फसवणूक केली : पी. चिदंबरम
अर्थसंकल्पावर काँग्रसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी टीका केली (P Chidambaram slams Modi government on Budget 2021).
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत आज (1 फेब्रुवारी) सादर केलेल्या अर्थसंकल्पावर काँग्रसचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी टीका केली. “अर्थमंत्र्यांनी भारतातील गरिब, होतकर, मजूर, शेतकरी आणि बेरोजगारांना यांना धोका दिला आहे. अर्थमंत्र्यांनी संसदेत त्यांचं भाषण ऐकणाऱ्या खासदारांसह सर्व लोकांची फसवणूक केली आहे”, असा टोला चिदंबरम यांनी लगावला (P Chidambaram slams Modi government on Budget 2021).
“अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सुरक्षा खात्यासाठी किती पैशांची तरतूद केली याबाबत फारसा उल्लेख करण्यात आला नाही. याशिवाय आरोग्य विभागासाठी ज्या आकड्यांचा उल्लेख केला त्यामध्ये लसीचे पैसे जोडले आहेत. याशिवाय फायनान्स कमीशनची ग्रँटभी जोडण्यात आली आहे. अर्थसंकल्पात सुरक्षा आणि आरोग्य विभागासाठी कोणतीच कमी सोडायला नको. हे आम्ही याआधीच सांगितलं आहे”, असं चिदंबरम म्हणाले (P Chidambaram slams Modi government on Budget 2021).
“काही राज्यांमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठमोठ्या किंमतीची तरतूद करण्यात आली आहे. मात्र, लोक वेडे नाहीत. त्यांना माहिती आहे, ही फक्त घोषणा आहे. पैश्यांची पूर्तता करण्यात अनेक वर्ष लागतील. या बजेटमधून फक्त निराशाच हाती लागली आहे. गेल्या वर्षासारखं या वर्षीदेखील काही दिवसांमध्ये बजेटची पोलखोल होईल. ट्रक्स रिलिजचा गरिब लोकांना नाही तर फक्त श्रीमंत लोकांना फायदा होईल”, अशी भूमिका काँग्रेसकडून मांडण्यात आली आहे.
अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची टीका
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली. बजेट देशासाठी हवं, निवडणुकांसाठी नको, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय अर्थसंकल्पावर टीका केली.
मरणाच्या दारात नेऊन ठेवलं: अजित पवार
कोरोना विषाणूची लस शोधून देशातील शास्त्रज्ञांनी जनतेला जीवनदान दिलं असताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पानं देशातील जनतेला पुन्हा एकदा मरणाच्या वाटेवर नेऊन ठेवलं आहे. दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांपासून गेल्या कोरोनाकाळात रोजगार गमावलेल्या कोट्यवधी युवकांच्या पदरी निराशाच पडली आहे,” अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा : कोरोना संकटातही देशाला नवउभारी देणारा अर्थसंकल्प, देवेंद्र फडणवीसांकडून केंद्राचं अभिनंदन