परेदशी उद्योगपतीस पद्मभूषण, चीनचा थयथयाट, कारण…

padma bhushan award | भारत सरकारने एका विदेशी उद्योगपतीचा पद्म पुरस्कार देऊन गौरव केला. त्यामुळे चीनचा संताप झाला आहे. चीनकडून भारताच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली गेली आहे. विदेशी उद्योगपती यंग लू यांना यंदा पद्म पुरस्कार दिला आहे.

परेदशी उद्योगपतीस पद्मभूषण, चीनचा थयथयाट, कारण...
उद्योगपती यंग लू सोबत नरेंद्र मोदी (फाईल फोटो)
Follow us
| Updated on: Jan 27, 2024 | 7:45 AM

नवी दिल्ली, दि.26 जानेवारी 2024 | भारत सरकारने पद्म पुरस्कारांची घोषणा गुरुवारी रात्री केली. या पुरस्काराची घोषणा भारतात झाली परंतु त्याच्या मिरच्या चीनला झोंबल्या. कारण भारत सरकारने एका विदेशी उद्योगपतीचा पद्म पुरस्कार देऊन गौरव केला. यंदाच्या पद्म पुरस्कारच्या यादीत चार उद्योगपतींचा सन्मान करण्यात आला. त्यात विदेशी उद्योगपती यंग लू आहेत. तैवानमधील मल्‍टीनेशनल इलेक्‍टॉनिक्‍स कॉन्‍ट्रैक्‍ट मॅन्‍यूफैक्‍चरिंग कंपनी फॉक्‍सकॉनचे (Foxconn) ते चेअरमन आहे. त्यांनी चीनमधील फॉक्सकॉनची गुंतवणूक काढून भारतात केली. त्यांना भारत सरकारने पद्मभूषण पुरस्कार दिला आहे.

अ‍ॅपल कंपनीचे प्रोडक्‍ट भारतात

सरकारची पद्म पुरस्काराची यादी जाहीर झाली. त्यात यंग लू यांचे नाव आहे. त्यांनी चीनमधील फॉक्‍सकॉनचा मॅन्‍युफैक्‍चरिंग प्‍लॅट बंद करुन भारतात शिफ्ट केला. फॉक्‍सकॉन अ‍ॅपल कंपनीचे प्रोडक्‍ट बनवते. आता आयफोनपासून आपपॅडपर्यंत अ‍ॅपलचे सर्व प्रॉडक्ट भारतातच तयार होत आहे. फॉक्सकॉनने चीनमधील गुंतवणूक काढल्यानंतर चीन संतापलेला होता. आता भारत सरकारने लू यांना पद्मभूषण देऊन गौरव केल्यामुळे चीनला अजून मिरच्या झोंबल्या आहे.

अजून तीन उद्योगपतींचा गौरव

लू यांच्यासोबत 3 भारतीय उद्योगपतींना पद्म सम्‍मान दिला गेला आहे. त्यात कर्नाटकातील सीताराम जिंदल यांना पद्मभूषण दिला आहे. महाराष्‍ट्रातील कल्‍पना मोरपरिया आणि कर्नाटकातील शशी सोनी यांना पद्मश्री पुरस्कार दिला आहे. केंद्र सरकारने एकूण 132 दिग्गजांसाठी पद्म पुरस्कार जाहीर केले आहे. त्यात कला, साहित्य, शिक्षण, खेळ, आरोग्य, समाजसेवा, विज्ञान, इंजीनियरिंग, सिव्हील सेवा, व्यापार, उद्योगचा समावेश आहे.

हे सुद्धा वाचा

केंद्र सरकारकडून देशातील 17 दिग्गजांना पद्म भूषण पुरस्कार देण्याची घोषणा झाली आहे. त्यात सुप्रीम कोर्टाच्या पहिल्या महिला न्यायाधीश फातिमा बीवी (मरणोत्तर) यांचाही समावेश आहे. याशिवाय माजी केंद्रीय मंत्री राम नाईक, अभिनेता मिथून चक्रवर्ती यांचे समावेश आहे. माजी उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू आणि अभिनेता चिरंजीवी यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.