पहलगाम हल्ल्याचा तपास एनआयएकडे, सूत्रांनी दिली माहीती
जम्मू-कश्मीरातील पहलगाम येथे मंगळवारी सकाळी झालेल्या अतिरेक्यांच्या गोळीबारात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला होता. या घटनेचे पडसाद देशभर उमटले असून या प्रकरणाचा तपास आता एआयए करणार आहे.

जम्मू-कश्मीरातील पहलगाम येथे मंगळवारी (२२ एप्रिल २०२५ ) सकाळी अतिरेक्यांनी केलेल्या बेछुट गोळीबारात २६ पर्यटक ठार झाले होते. या प्रकरणात आता पर्यंत कोणालाही अटक झालेली नसली तर संशयित अतिरेक्यांचे व्हिडीओ आणि छायाचित्रे जारी झाली आहे. या प्रकरणात तपास आता एनआयए करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पहलगाम येथील खोऱ्यात पर्यटक बैरसण येथे सहलीचा आनंद घेत असताना मंगळवारी २२ एप्रिल रोजी त्यांच्यावर मोठा हल्ला झाला. त्यानंतर देशभरात संतापाचे वातावरण आहे. त्यातच हा तपास आता एनएआय करणार असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे. हे प्रकरण एनआयएकडे सोपवले आहे. जम्मू काश्मिरी पोलीस आणि अन्य तपास यंत्रणा एनआयएला मदत करणार आहे.
एनआयएची पथकं पुण्यात
एनआयए दोन सदस्यीय पथक काल सायंकाळी ५ ते ७ च्या दरम्यान दिवंगत संतोष जगदाळे यांच्या पुणे कर्वेनगर येथील निवासस्थानी दाखल झाले होते.यावेळी पथकाने आणि जगदाळे यांची पत्नी आणि मुलीसह कुटुंबातील सदस्यांशी चर्चा केली. दोन महिला जगदाळे यांच्यासोबत काश्मीरच्या सहळीला गेल्या होत्या आणि लोकप्रिय बैसरन खोऱ्यात सहलीचा आनंद लुटत असताना झालेल्या गोळीबारात त्या थोडक्यात बचावल्या अशी माहीती पोलिस सूत्रांनी दिली आहे.



