भारतीय सैन्य दलाचा दहशतवाद्यांना दणका! शोपिया-पुलवामा-कुलगाममध्ये अशा नांग्या ठेचल्या, बॉम्ब लावून…
Security Forces Action : पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता भारतीय सैन्य दल ॲक्शन मोडमध्ये आले आहे. दहशतवाद्यांना शोधून ठार करण्यात येत आहे. तर स्थानिक दहशतवाद्यांना कायमचा धडा शिकवण्यात येत आहे. शोपिया-पुलवामा-कुलगाममध्ये मोठी कारवाई करण्यात येत आहे.

पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सैन्य दल ॲक्शन मोडमध्ये आले आहे. जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांना शोधून ठार करण्यात येत आहे. व्यापक शोध मोहिम राबवण्या आली आहे. तर स्थानिक दहशतवाद्यांना कायमचा धडा शिकवण्यात येत आहे. शोपिया-पुलवामा-कुलगाममध्ये मोठी कारवाई करण्यात येत आहे. भारत-पाकिस्तान सीमेजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. शोपिया-पुलवामा-कुलगाममध्ये मोठी कारवाई करण्यात येत आहे.
सैन्य दलाचा मोठा दणका
जम्मू-काश्मीर मधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय सुरक्षा दलाची मोहिम सुरू आहे. पुलवामामध्ये दहशतवादी कारवायात सहभागी दहशतवाद्यांची घरे सुरक्षा दलांनी उद्धवस्त केली आहेत. काल पहेलगाव हल्ल्यातील दोन स्थानिक दहशतवाद्यांची घरं उद्धवस्त करण्यात आली होती. तर आता आणखी दोन दहशतवाद्यांची घरं पाडण्यात आली आहेत. जून 2023 मध्ये लष्कर-ए-तैयब्बाचा एहसान अहमद शेख याचे दोन मजल्याचे घर सुरक्षा दलांनी आयईडीचा उपयोग करुन उडवले. शेख हा पुलवाम्यातील मुर्रान येथील रहिवासी आहे.




अशाच एका दुसऱ्या कारवाईत 2 वर्षांपूर्वी दहशतवादी संघटनेत सहभागी शाहिद अहमदचे घर शोपियांमधील चोटीपोरा परिसरात स्फोट करून उडवून दिले. पहेलगाममध्ये आतापर्यंत 5 दहशतवाद्यांची घरं उद्धवस्त करण्यात आली आहेत. याशिवाय काल रात्री कुलगामच्या क्विमोहमधील जाकीर गनीचे घर पाडण्यात आले. तो 2023 मध्ये लष्कर या दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. पहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आतापर्यत 5 दहशतवाद्यांची घरं पाडण्यात आली आहेत.
आदिल गोजरी (बिजबेहरा)
आसिफ शेख (त्राल)
अहसान शेख (पुलवामा)
शाहिद कुट्टे (शोपियां)
जाकिर गनी (कुलगाम)
शुक्रवारी रात्री सुरक्षा दलांनी कुलगाम येथील क्विमोहमधील जाकीर गनीचे घर स्फोटकं लावून पाडले. तो 2023 मध्ये दहशतवादी संघटनेत सहभागी झाला होता. तर लष्कराने बिजबेहरा येथील आदिल थोकरचे घर स्फोटकांनी उडवले. तो पहेलगाव हल्ल्यात सहभागी असल्याचे समोर येत आहे. तर त्राल मधील आसिफ शेख याचे घर पाडण्यात आले. तो 22 एप्रिल रोजीच्या पहेलगाव हल्ल्यात सहभागी होता असे स्पष्ट झाले आहे.