PoK मध्ये लवकरच फडकणार तिरंगा, पाकव्याप्त काश्मीरमध्ये भीषण स्थिती, काय चाललय ते एकदा वाचा
POK | आता पाकिस्तानचा प्रोपेगेंडा चालणार नाही. कारण पाकिस्तानने आतापर्यंत मुस्लिम देशांना खोटी माहिती दिली. G20 आधी पाकिस्तानने G20 च्या सदस्य देशांना चिठ्ठी लिहीली होती. त्यात वाटेल ते आरोप करण्यात आले होते.
श्रीनगर : पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत चाललीय. लवकरच पाकिस्तानातील सत्ताधाऱ्यांची झोप उडणार आहे. POK मध्ये स्वातंत्र्याची मागणी जोर धरु लागली आहे. पाकिस्तान POK आपला भूभाग असल्याच सांगून जगाची दिशाभूल करत आला आहे. आता अनेक इस्लामिक देशांनी पाकिस्तानचा हा दावा फेटाळून लावलाय. POK हे भारताच अविभाज्य अंग आहे, यावर UAE ने शिक्कामोर्तब केलय. जम्मू-काश्मीर राज्य विकास मार्गावर वेगाने मार्गक्रमण करतय. हीच गोष्ट आता पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील लोकांच्या लक्षात आली आहे. भारतात आल्यानंतरच पीओकेच नशीब बदलू शकतं. कारगिल बॉर्डर खुली करा, आम्हाला भारतात जायचं आहे, अशी पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधील नागरिकांची मागणी आहे. जर तुम्ही आम्हाला सुविधा देऊ शकत नसाल, तर बॉर्डर खुली करा, आम्हाला भारतात जाऊ द्या असं POK मधील नागरिकांच म्हणणं आहे.
POK मध्ये मागच्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात विरोध प्रदर्शन पहायला मिळालय. आम्ही भारतात गेलो, तर आम्हाला दोनवेळच अन्न मिळेल. इथे प्रचंड वीजेच बिल येतय. जगणं कठीण झालय असं पीओकेमधील नागरिकांच म्हणणं आहे. आता पाकिस्तानचा प्रोपेगेंडा चालणार नाही. कारण पाकिस्तानने आतापर्यंत मुस्लिम देशांना खोटी माहिती दिली. G20 आधी पाकिस्तानने G20 च्या सदस्य देशांना चिठ्ठी लिहीली होती. त्यात वाटेल ते आरोप करण्यात आले होते. पण G20 च्या यशस्वी आयोजनाने पाकिस्तानची पोलखोल झाली. तिथल्या जनतेचे डोळे उघडले आहेत.
गिलगिट, बाल्टिस्तानच्या जनतेच काय म्हणणं?
तुम्ही तुमच्या फायद्याच्या गोष्टी इथून घेऊन जाता, असं गिलगिट, बाल्टिस्तानचे लोक म्हणत आहेत. आयुष्य जगण्यासाठी आम्हाला रोजच्या आवश्यक गोष्टी पाहिजेत. तुम्हाला आमच्यासोबत असच वागायच असेल, तर बॉर्डर खुली करा. आम्ही भारतासोबत जाऊ. पाकिस्तानच्या जनतेचा पाकिस्तानी गोष्टींवर जितका अधिकार आहे. तितकाच गिलगिट, बाल्टिस्तानच्या जनतेचा आहे. पण तो अधिकार त्यांना मिळत नाही. पाकिस्तान फक्त एक भूभाग म्हणून आमच्याकडे बघतो असं इथल्या लोकांच म्हणणं आहे.