POK मधील शारदा मंदिरावर पाकिस्तानी लष्कराचा कब्जा, PM मोदींकडे समितीने मागितली मदत

POK sharda Temple : पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या शारदा मंदिराच्या समितीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हस्तक्षेप करण्याची मागणी त्यांनी केली आहे. पाकिस्तानी सैन्याने ऐकले नाहीतर सीमेकडे कूच करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

POK मधील शारदा मंदिरावर पाकिस्तानी लष्कराचा कब्जा, PM मोदींकडे समितीने मागितली मदत
pok
Follow us
| Updated on: Dec 29, 2023 | 5:13 PM

नवी दिल्ली : पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील शारदा मंदिर संकुलावर पाकिस्तानी लष्कराने कब्जा केला आहे. त्यानंतर शारदा बचाव समितीने यावर  संताप व्यक्त केला.समितीने शुक्रवारी भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे मदत मागितली. समितीने पाकिस्तानी लष्कराचा कब्जा हटवण्यासाठी ही मदत मागितील. जेणेकरुन मंदिराच्या जीर्णोद्धाराचा मार्ग मोकळा होईल.

एसएससीचे संस्थापक रविंदर पंडिता यांनी बंगळुरूत पत्रकार परिषदेत बोलताना, समितीच्या बाजूने न्यायालयाचा आदेश असतानाही पाकिस्तानी लष्कराने शारदा मंदिर परिसर ताब्यात घेतला आणि तेथे ‘कॉफी हाऊस’ बांधल्याचा आरोप केला आहे.

शारदा बचाव समितीने पाकिस्तानी लष्कराने शारदा पीठ संकुलात नुकतेच बांधलेले कॉफी हाऊस हटवण्याचा आणि ताब्यात घेण्याचा मुद्दा भारत सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उपस्थित करण्याची विनंती केली. 3 जानेवारी 2023 रोजी पीओकेच्या सर्वोच्च न्यायालयाने शारदा बचाव समितीच्या बाजूने निकाल दिला होता.

शारदा पीठ पुन्हा सुरू करण्याची मागणी केली

पीओकेमधील नागरी समाजानेही या समस्येबद्दल आणि सीमा भिंतीला झालेल्या नुकसानाबाबत एसएससीसह आवाज उठवला आहे. भाविकांना यात्रेला जाण्यासाठी शारदा पीठ पुन्हा खुले करावे, अशी मागणी रविंदर पंडिता यांनी केली.

ते म्हणाले की जर पाकिस्तान अधिकारी आणि त्यांच्या सैन्याने कॉफी होम हटवले नाही तर आम्ही नियंत्रण रेषेकडे (एलओसी) कूच करू आणि ते ओलांडू. या मोर्चासाठी सर्व शारदा समर्थकांना सज्ज राहण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. त्याचवेळी रविंदर पंडिता यांनी शारदा पीठाला युनेस्को हेरिटेज साईट म्हणून घोषित करण्याची मागणी केली आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.